India vs England 2nd Test | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कॅप्टन विराटला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england 2nd test) यांच्यात 13 फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

India vs England 2nd Test | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कॅप्टन विराटला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी
विराट कोहली (Virat Kohli) इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स ( 100 million followers on instagram) असणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 13 फेब्रुवारीपासून चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये ( MA Chidambaram Stadium) दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाचा दुसऱ्या सामन्यातून जोरदार कमबॅक करण्याचा मानस असणार आहे. या दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची नामी संधी आहे. (india vs england 2nd test virat kohli have chance to break ricky ponting most century record as a captain)

काय आहे रेकॉर्ड?

विराटला एक कर्णधार म्हणून हा विक्रम करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी विराटला आहे. पॉन्टिंगने कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यामध्ये 22 आणि टेस्टमध्ये 19 अशा एकूण 41 शतकं झळकावली आहेत. तर विराटच्या नावे टेस्टमध्ये 20 तर वनडेमध्ये 21 शतकांची नोंद आहे.

कर्णधार म्हणून शतकांच्या बाबतीत विराट आणि पॉन्टिंग बरोबरीत आहे. यामुळे विराटने या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यास तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं झळकावणारा पहिला आण एकमेव फलंदाज ठरेल. त्यामुळे विराट या दुसऱ्या कसोटीमध्ये पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक करत विश्व विक्रमाला गवसणी घालणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

भारताचा चौथा कसोटी पराभव

टीम इंडियाचा कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील सलग चौथा पराभव ठरला. फेब्रुवारी 2020 पासून म्हणजेच गेल्या वर्षभरात टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात एकूण 4 कसोटी सामने खेळली आहे. या 4 ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला 2 वेळा न्यूझीलंड तर प्रत्येकी 1 वेळा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत व्हाव लागलं आहे.

दुसऱ्या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून मॅचचा आनंद घेता येणार आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे. प्रेक्षकांना कोरोना नियमाचं पालन करावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL Auction 2021 | ‘केरळ एक्सप्रेस’ एस श्रीसंतला मोठा झटका, आयपीएल खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार

India vs England 2021 | इंग्लंडला मोठा धक्का, हुकमाचा एक्का जायबंदी, दुसऱ्या कसोटीला मुकणार

Virat Kohli | ‘रनमशीन’ कॅप्टन विराट कोहलीची विक्रमाला गवसणी, क्लाइव लॉईड यांना पछाडलं

India vs England 1st Test | इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव, त्यानंतरही कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ विक्रम

(india vs england 2nd test virat kohli have chance to break ricky ponting most century record as a captain)

Published On - 1:15 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI