India vs England 3rd Test | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, म्हणाला…

सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar) ट्विट करत याबाबतची भविष्यवाणी केली आहे.

India vs England 3rd Test | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, म्हणाला...
sachin tendulkar admitted to hospital after corona infected

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील (India vs England 3rd Test) पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 3 विकेट्स गमावून 99 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडने पहिल्या डावात 112 धावा केल्या. ही मॅच डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. दरम्यान हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (आधीचे मोटेरा स्टेडियम) खेळवण्यात येत आहे. हा स्टेडियम जगातील सर्वात मोठा स्टेडियम आहे. या टेस्ट बद्दल टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटद्वारे भविष्यवाणी केली आहे. (india vs england 3rd test 1 st day sachin tendulkar talks on impact sabarmati river on match)

सचिन काय म्हणाला?

“स्टेडियम साबरमती जवळ असल्याने खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. परिणामी खेळपट्टीचा रंग एकच असेल. यामुळे तुम्ही चकित होऊ नका,” अशी भविष्यवाणी सचिनने केली आहे.

खेळपट्टी रंग बदलणार नाही

साधारणपणे कसोटी सामन्यातील विशेष करुन भारतात प्रत्येक दिवशी खेळपट्टी रंग बदतो. खेळपट्टीत भेगा पडतात. मात्र सचिननुसार साबरमती नदीजवळ स्टेडियम असल्याने खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. त्यामुळेच खेळपट्टीचा रंग बदलणार नाही. या खेळपट्टीतील ओलाव्यामुळे संध्याकाळी वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होऊ शकतो.

पहिल्या दिवसाचा धावता आढावा

इंग्लंडने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 100 वा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. इशांतने डॉम सिबलीला शून्यावर बाद केलं. यानंतर टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पाहुण्या इंग्लंडला आपल्या फिरकीने फसवलं. लोकल बॉय अक्षर पटेलने एकूण 6 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने 3 विकेट्स मिळवल्या. अशा प्रकारे इंग्लंडंचा पहिला डाव 112 धावांवर आटोपला.

त्यानंतर टीम इंडिया पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आली. भारताची सावध सुरुवात राहिली. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने 33 धावांची भागीदारी केली. यानंतर शुबमन गिल 11 धावांवर बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. पण चेतेश्वर आता तसाच भोपळा न फोडता माघारी गेला.

रोहित-विराटची भागीदारी

यामुळे भारताची 34-2 अशी स्थिती झाली. पण यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. या दरम्यान हिटमॅन रोहितने 63 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही षटकांचा खेळ बाकी होता. तेवढ्यात विराट कोहली आऊट झाला. विराटने 27 धावा केल्या. विराटला 27 धावांवर जीवनदान मिळालं. पण विराटला त्याचा फायदा घेता आला नाही.

विराटनंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. अजिंक्यने 1 धाव केली. तो पर्यंत दिवसाचा खेळ संपला. अशा प्रकारे भारताने पहिल्या दिवसखेर 3 विकेट्स गमावून 99 धावा केल्या. रोहित शर्मा 57 तर अजिंक्य रहाणे 1 धावेवर नाबाद आहेत.

संबंधित बातम्या :

India vs England 3rd Test 1st Day Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 3 बाद 99 धावा, रोहित-अजिंक्य मुंबईकर जोडी मैदानात

India vs England 3rd Test | घरच्या मैदानात लोकल बॉय अक्षर पटेलचा इंग्लंडला दणका, घेतल्या सहा विकेट्स

(india vs england 3rd test 1 st day sachin tendulkar talks on impact sabarmati river on match)

Published On - 11:01 pm, Wed, 24 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI