IND vs ENG | इंग्लंडविरुद्धच्या कसोटींसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही, TNCA चा मोठा निर्णय

इंग्लंड टीम इंडियाविरोधात (England Tour India 2021) कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

IND vs ENG | इंग्लंडविरुद्धच्या कसोटींसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही, TNCA चा मोठा निर्णय
इंग्लंडविरोधातील पहिले 2 कसोटी सामने चेन्नईमध्ये खेळण्यात येणार आहेत
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 11:55 AM

चेन्नई : ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिल्यानंतर टीम इंडिया इंग्लडविरुद्ध (Team India) भिडण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची (England Tour India 2021) सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. तामिळनाडू क्रिकेट बोर्डाने (Tamil Nadu Cricket Association) हे 2 सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांना या 2 कसोटी सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंट लुटता येणार नाही. या मालिकेतील पहिला सामना 5-9 फेब्रुवारी, तर दुसरा सामना 13-17 फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे. (india vs england first 2 Test matches cricket fans not be permitted in the stadium tncb ruled)

या 2 सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नसल्याची माहिती तामिळनाडू क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सदस्यांना दिली आहे. केंद्र सरकारने सर्व आऊटडोर खेळांसाठी 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र यानंतरही तामिळनाडू बोर्डाने हा निर्णय घेतला.

TNCA जोखीम स्वीकारण्यास तयार नाही

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी आपण प्रेक्षकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचं TNCA चे सचिव आर. रामास्वामींनी बोर्डाच्या सदस्यांना सांगितलं. याचाच अर्थ असा की क्रिकेट चाहत्यांसह विशेष अतिथी आणि बोर्डाच्या सदस्यांनाही या सामन्याला उपस्थित राहता येणार नाही.

मोटेरामध्ये  प्रेक्षकांना परवानगी

या मालिकेतील उर्वरित 2 सामने हे गुजरातमधील अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. या स्टेडियमध्ये एकूण क्षमतेच्या 20 ते 30 टक्के चाहत्यांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळू शकते. गुजरात क्रिकेटचे वरिष्ठ अधिकारी यांनी क्रिकइंफोसोबत संवाद साधला. “आम्ही 20 ते 30 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने खेळवणार आहोत, असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

या कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 आणि 3 मॅचची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | टीम इंडियाला भारतात पराभूत करणं अवघड : जो रुट

England Tour India | ना जाडेजा, ना विहारी, तरीही इंग्लंडविरुद्ध भारताची मधळी फळी तुफानी!

(india vs england first 2 Test matches cricket fans not be permitted in the stadium tncb ruled)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.