AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : तो आला आणि विजय इंग्लंडपासून दूर नेला.. कर्णधार सूर्यकुमार यादवने कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट ? तुम्हाला पटतंय?

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता फायनलमध्ये भारतीय संघ न्युझीलंडशी भिडणार असून पुन्हा एकदा वर्ल्डकप ट्रॉफी उचलण्यास उत्सुक आहे. दरम्यान इंगल्ंडविरुद्धच्या सामन्या विजय मिळवल्यानंतर काला कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्याचा टर्निंग पॉईंट सांगितला. सामना कुठे फिरला हे त्याने स्पष्टच सांगितलं.

Suryakumar Yadav : तो आला आणि विजय इंग्लंडपासून दूर नेला.. कर्णधार सूर्यकुमार यादवने कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट ? तुम्हाला पटतंय?
सूर्यकुमार यादवImage Credit source: social media
| Updated on: Mar 06, 2026 | 10:29 AM
Share

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कालच्या सेमी फायनलमध्ये भारताने विजय मिळवत फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. इंग्लंडला 7 धावांनी हरवत भारत जिंकला आणि आता फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना न्.ुझीलंडशी होणार आहे. 8 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्याकडे प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागलं आहे. दरम्यान कालच्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्याचा टर्निंग पॉईंट कोणता ते सांगत एका खास व्यक्तीला या विजयाचं श्रेय दिलं. भारतात वर्ल्डकप खेळणं आणि संघाचे नेतृत्व करणे ही खूप खास भावना आहे. विशेषतः जेव्हा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे, तेव्हा तो खूप महत्वाचा ठरतो.

“ही एक अविश्वसनीय भावना आहे. भारतात खेळणं, इतक्या उत्तम संघाचं नेतृत्व करणं आणि इथे वर्ल्डकपमध्ये खेळणं हे खूपच खास आहे. आता, अंतिम सामना खेळण्यासाठी अहमदाबादला जाणं हा आम्हा सर्व खेळाडूंसाठी एक अतिशय खास क्षण आहे.” असं तो मम्हणाला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान कालचा सामना कुठे फिरला, त्याबद्दलही सूर्या स्पष्टच बोलला.

सॅमसनच्या शानदार खेळीबद्दल काय म्हणाला कर्णधार ?

कालच्या सामन्यात शानदार फलंदाजी कामगिरीबद्दल सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचंही कौतुक केलं. मैदानावर पाऊल ठेवताच काय करायचं आहे ते सॅमसनला नेमकं कळलं होतं, असं तो म्हणाला. तो फलंदाजीसाठी बाहेर पडताच, त्याला काय करायचे आहे हे माहित होते. विकेट चांगली होती, म्हणून जेव्हा जेव्हा विकेट पडली, तेव्हा त्याने आक्रमकता कायम ठेवली. संघाला आवश्यक असलेल्या पद्धतीने त्याने अगदी बरोबर फलंदाजी केली. गेल्या वर्षभरात त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे आज फळ मिळाले अशा शब्दांत सूर्याने संजूचं कौतुक केलं.

कोणी पलटली मॅच ?

कालच्या सामन्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केलं आणि तिथून सामना भारताच्या बाजूने झुकला, असं सूर्याने मान्य केलं. “जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि इतर गोलंदाजांनी ज्या पद्धतीने सामना परत खेचून आणला, ते अविश्वसनीय होतं. बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी काय करत आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याने आजही तेच केले आणि विजय दूर जाऊ दिला नाही, अशा शब्दातं कॅप्टननने बुमराहवर स्तुतीसुमनं उधळली. 18 व्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त 6 धावा दिल्या. एवढंच नव्हे तर अक्षर पटेलने पकडलेला कॅच आणि हार्दिकची 19 वी ओव्हर देखील निर्णायक ठरली,त्यात फक्त 9 धावा दिल्या.

इंग्लंडने केलेला धावांचा पाठलाग खूपच रोमांचक झाला. मॅचनंतर सूर्याने मजेत सांगितलं की, त्याने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकला विचारलं होतं की त्यांना त्यांच्याविरुद्ध किती धावा काढायच्या आहेत. तो म्हणाला, “अरे देवा! मी हॅरी ब्रुकला सांगितलं, ‘तुझ्याविरुद्ध आम्हाला किती धावा कराव्या लागतील?’ असं मजेत सूर्याने सांगितलं. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, खेळपट्टी खूप चांगली होती. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तो संपूर्ण सामन्यात स्पर्धेत टिकून होता.” असंही सूर्या म्हणाला.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Kunbi Certificate Update | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय