India vs New Zealand Live, WTC Final 2021 4th Day : क्रिकेटप्रेमींची निराशा, पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द

India vs New Zealand Live Score : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने फलंदाजीला सुरुवात केली असून न्यूझीलंडने 101 धावांवर 2 विकेट गमावले असून चौथ्या दिवसाची सुरुवात केन विल्यमसन आणि रॉस टेलर फलंदाजीने करणार आहेत.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 4th Day : क्रिकेटप्रेमींची निराशा, पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final

India vs New Zealand WTC Final 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यावर (WTC Final 2021)  न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काईल जेमिनसनने उत्कृष्ट गोलंदाजी करत अर्धा भारतीय संघ (5 बळी) बाद केला. त्याला ट्रेंट बोल्ट आणि वॅगनरने प्रत्येकी 2 बळी घेत चांगली साथ दिली. (India vs New Zealand live score WTC Final 2021 4th Day Match Scorecard online Southampton in marathi)

त्यानंतर फलंदाजी करणाऱ्याने न्यूझीलंडच्या संघाने संयमी खेळ करत 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. कॉन्वे याने अर्धशतक ही झळकावलं. पण लेथमला शमीने आणि कॉन्वेला इशांत शर्माने बाद करत भारताला दोन विकेट मिळवून दिल्या. त्यानंतर काही वेळातच सामना दिवसभराचा खेळ आटोपून थांबवण्यात आला. दिवसाखेरीस न्यूझीलंडची स्थिती 101 वर 2 बाद असून आता चौथ्या दिवसाची सुरुवात कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलर करणार होते. मात्र साऊदम्पटनमध्ये पावसाने हजेरी लावल्याने खेळ सुरु होण्यास विलंब झाला आहे. पहिला सेशन होऊन लंच देखील झाला. त्यानंतर दुसरे सेशन सुरु झाले असून अद्यापही पाऊस सुरुच असल्याने सामना सुरु होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.

Match Highlights

 • भारताचा डाव 217 धावांवर आटोपला

  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्णयाला साजेशी खेळी करत न्यूझीलंडने अप्रतिम बोलिंगच्या जोरावर भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स मिळवले. तर भारताकडून रहाणे (49) आणि कोहली (44) यांच्याशिवाय कोणालाच खास धावसंख्या करता आली नाही. भारताला शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात (62 धावांची भागीदारी)
  करुन दिली. मात्र शर्माच्या बाद झाल्यानंतर गिल आणि नंतर पुजारा दोघेही लवकर बाद झाले. ज्यामुळे दुसऱ्या दिवसाखेरीस भारताचा स्कोर 146 वर 3 बाद होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीपासून एक एक विकेट जाण्यास सुरुवात झाली आधी विराट मग पंत बाद झाला. दरम्यान अजिंक्य संयमी खेळी करत असताना न्यूझीूलंडच्या जाळ्यात अडकला आणि भारताची सहावी विकेट पडली. ज्यानंतर काही वेळात आश्विन ही बाद झाला. सामन्याची संपूर्ण मदार जाडेजावर असताना बुमराह आणि इशांत हे जेमिसनच्या ओव्हरमध्ये लागोपाठ बाद झाले. ज्यानंतर 92 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जाडेजाही बाद झाला आणि भारताचा डाव 217 धावांवर आटोपला.

 • सामन्यावर किंवींची पकड

  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्यातरी न्यूझीलंड सरसआहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 21 Jun 2021 20:30 PM (IST)

  क्रिकेटप्रेमींची निराशा, पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द

  पावसामुळे आजच्या दिवसातही एकही चेंडू खेळवता आलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतीच माहिती दिली आहे की, पाऊस आणि खराब हवामामामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

 • 21 Jun 2021 19:21 PM (IST)

  WTC Final 2021 : पाऊस थांबता थांबेना, सामन्याला मोठा विलंब

  साऊदम्पटनमध्ये अजूनही पाऊस सुरुच असल्याने सामना सुरु करण्यात आलेला नाही. काळे ढग अजूनही असल्याने सामना सुरु होण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.

 • 21 Jun 2021 17:13 PM (IST)

  WTC Final 2021 : पहिल्या सेशनची वेळ संपली, लंच ब्रेक

  साऊदप्टनमध्ये पावसामुळे चौथ्या दिवशीच्या खेळात व्यत्यय आला आहे. त्यामुळे पहिल्या सेशनची वेळ संपली असून लंच ब्रेक करण्यात आला आहे.

   

 • 21 Jun 2021 16:41 PM (IST)

  अजूनही पाऊस सुरुच…

  साऊदप्टनमध्ये अजूनही पाऊस सुरु असल्याने चौथ्या दिवशीचा खेळ अजूनही सुरु झालेला नाही. दरम्यान पहिल्या दिवशीप्रमाणे चौथ्या दिवशीचा खेळही रद्द केला जाण्याची चर्चाही सुरु आहे.

 • 21 Jun 2021 15:13 PM (IST)

  WTC Final 2021 : पावसाच्या हलक्या सरी , सामना उशिराने सुरु होणार

  साऊदप्टनमध्ये पावसाच्या हलक्या सरी असल्यातरी सामना खेळण्यायोग्य परिस्थिती नाही. हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर सामना उशिराने सुरु होणार आहे.

 • 21 Jun 2021 14:52 PM (IST)

  WTC Final 2021 : साऊदम्पटनमध्ये पावसाची हजेरी

  साऊदम्पटनमध्ये पावसाने हजेरी लावल्याने चौथ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यास उशीर होणार आहे.