AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana : स्मृती मानधना हिला धक्क्यावर धक्के, आता काय घडलं ?

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा सात विकेट्सनी पराभव केला. सलामीवीर शफाली वर्माने नाबाद 69 धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Smriti Mandhana :  स्मृती मानधना हिला धक्क्यावर धक्के, आता काय घडलं  ?
sn=mriti mandhana
| Updated on: Dec 24, 2025 | 11:56 AM
Share

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज शफाली वर्मा (Shafali Verma) हिने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी केली. तिने फक्त 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 129 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेफालीने 34 चेंडूत नाबाद 69 धावा करताना 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या तूफान खेळीमुळे भारताने अवघ्या 12 व्या षटकात सामना जिंकला आणि शेफालीला तिच्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

स्मृती मानधनाला टाकून शफालीची आगेकूच

शफाली वर्माचा हा भारतासाठी खेळलेला 92 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. 8 व्यांदा तिने प्लेअर ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार जिंकला. यासह तिने स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि जेमिमा रॉड्रिग्स हिला मागे टाकलं आहे. स्मृती मानधना हिच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  स्मृती आणि जेमिमा या दोघींनी प्रत्येकी 7 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे. स्मृतीने 155 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळवण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे, तिने 12 वेळा पुरस्कार जिंकला असून 11 पुसर्कारांसह हरमनप्रीत कौर दुसऱ्या स्थानी आहे.

मिताली राज- 12

हरमनप्रीत कौर- 11

शेफाली वर्मा- 8

स्मृति मानधना – 7

जेमिमा रोड्रिग्स- 7

मॅचमध्ये  काय झालं ?

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने 9 विकेट्स गमावून 128 धावा केल्या. श्रीलंकेसाठी हर्षिता समरविक्रमाने सर्वाधिक 33 धावा केल्या, तर कर्णधार चमारी अथापथूने 31 धावा केल्या. हसिनी परेराने 22 धावा केल्या. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2, तर क्रांती गौर आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट टिपली.

प्रत्युत्तरादाखल भारताने अवघ्या 11.5 षटकांत सामना जिंकला. 21 वर्षीय शफाली वर्माने 34 चेंडूत एक षटकार आणि 11 चौकारांसह 69 धावा केल्या. दरम्यान, जेमिमा रॉड्रिग्जने 26 केल्या. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना 26 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाईल.

ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?.
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला.
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार.
भाऊंच्या नाराजीची 'डरकाळी' संपली? भाजपात उपरे येऊन झाले गब्बर?
भाऊंच्या नाराजीची 'डरकाळी' संपली? भाजपात उपरे येऊन झाले गब्बर?.
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.