भारताचा एक खेळाडू ज्याने 4 मॅचेसमध्ये ठोकले 1000 रन्स, 33 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळला, रेकॉर्ड्सचा डोंगर रचला!

केवल नाम ही काफी हैं... असं ज्या खेळाडूच्या बाबतीत म्हणायचं तर मराठमोळे क्रिकेटर विजय हजारे (Vijay Hazare birth Anniversary)

भारताचा एक खेळाडू ज्याने 4 मॅचेसमध्ये ठोकले 1000 रन्स, 33 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळला, रेकॉर्ड्सचा डोंगर रचला!
विजय हजारे, भारताचे दिवंगत माजी खेळाडू

 Vijay Hazare Birth Anniversary : केवल नाम ही काफी हैं… असं ज्या खेळाडूच्या बाबतीत म्हणायचं तर मराठमोळे क्रिकेटर विजय हजारे (Vijay Hazare)… भारताचे माजी कर्णधार… यशस्वी खेळाडू, संघर्षशील प्रवास त्यातही धावांचा डोंगर, रेकॉर्डब्रेक कामगिरी असं त्यांच्या क्रिकेट करिअरचं वर्णन करता येईल…  आज त्यांचा जन्मदिवस… त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने घेतलेला त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा आढावा… (Indian Cricketer Vijay Hazare birth Anniversary)

1947-1978 ला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात विजय हजारे यांनी अविस्मरणीय खेळी करत भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात कायमचं घर केलं. कठीण काळात त्यांनी आपल्या बॅटिंगचा अप्रतिम नमुना सादर केला.

विजय हजारे यांनी भारतासाठी 30 कसोटी सामने खेळले. यामधल्या 14 सामन्यांत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. विजय हजारे आणि विजय मर्चंट यांनी भारतीय क्रिकेटला एक नवी ओळख मिळवून दिली. इंग्लंडविरुद्ध त्यांनी 1946 ला क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉड्सवर त्यांनी डेब्यू केला तर 1953 मध्ये त्यांनी आपला अखेरचा क्रिकेट सामना खेळला.

विजय हजारे यांची ओळख

विजय हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्याचे वडील शालेय शिक्षक होते. विजय हजारे उजव्या हाताचे फलंदाज आणि मध्यम वेगवान गोलंदाज होते. जेव्हा तो क्रिकेटमध्ये आपलं करिअर घडवू पाहत होते तेव्हा दुसर्‍या महायुद्धामुळे त्यांच्या करिअरने स्टॉप घेतला होता. त्यामुळे त्यांना क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी काही वेळ लागला.

विजय हजारे नावाची जादू

पण दरम्यानच्या काळात त्यांनी घरगुती क्रिकेटमधील खेळाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. हा काळ भारतीय क्रिकेटसाठी अतिशय कठीण होता. पण याच काळात भारतात क्रिकेट टिकवून ठेवण्याचे मोठं श्रेय विजय हजारे यांना जातं. त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर 20-30 हजार प्रेक्षक जमायचे.

चार सामन्यांत 1000 धावा

वर्ष 1943–44 मध्ये विजय हजारे यांनी 1423 धावा ठोकल्या. या दरम्यान त्यांनी चार सामन्यांत 248, 59, 309, 101, 223 आणि 87 अशा एकूण 1423 धावांचा रतीब घातला. एकूणच चार सामन्यात त्यांवी 1000 धावा केल्या.

विजय हजारे यांची 309 धावांची खेळी खूपच संस्मरणीय ठरली. हिंदू संघाविरूद्ध खेळताना हजारे यांनी हा डाव खेळला. गमतीची गोष्ट अशी की तिहेरी शतक झळकावूनही त्यांचा संघ 387 धावांवर बाद झाला. म्हणजे उर्वरित फलंदाज 78 धावा करू शकले. यामुळे त्यांच्या संघाला एका डावाने पराभव पत्करावा लागला होता.

फर्स्ट क्लास क्रिकेटमधला धावांचा डोंगर

विजय हजारे यांनी फलंदाजीमध्ये विजय मर्चंट यांच्याशी स्पर्धा केली. या कारणास्तव, दोघांमध्ये मोठे स्कोअर बनविण्यासाठी चढाओढ झाली. हजारे बर्‍याच दिवस प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. ते जवळजवळ 33 वर्षांचे होईपर्यंत क्रिकेट खेळले. या काळात त्यांनी 238 सामन्यात 60 शतके आणि 73 अर्धशतकांसह 18740 रन्स केले.

तिहेरी शतक झळकवणारे पहिले फलंदाज

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर प्रथम श्रेणीच्या सरासरीच्या बाबतीत हजारे भारतीय क्रिकेटपटूंमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. तिहेरी शतक झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाज होते. दलीपसिंगजींनीही हा पराक्रम केला होता पण त्यांना एक इंग्लिश क्रिकेटपटू मानलं गेलं.

(Indian Cricketer Vijay Hazare birth Anniversary)

हे ही वाचा :

Video : हरभजनच्या बोलिंग अॅक्शनची सेम टू सेम नक्कल, दस्तुरखुद्द भज्जीकडून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर

Ind Vs Eng : भारतीय संघाला झटका, हा खेळाडू फिटनेस टेसमध्ये नापास, सिरीजमधूनही बाहेर!

Published On - 9:44 am, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI