युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पुन्हा एकत्र, घटस्फोटाच्या 11 महिन्यानंतर मोठा निर्णय घेत थेट…
भारतीय संघाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत होता. 2020 मध्ये युजवेंद्र चहल याने धनश्री वर्मा हिच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या चार वर्षातच घटस्फोट घेतला. आता दोघे परत एकत्र येणार आहेत.

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांनी कोर्टात माहिती दिली की, गेल्या 18 महिन्यांपासून ते विभक्त राहत आहेत. कोरोनाच्या दरम्यान युजवेंद्र चहल याने धनश्रीकडे डान्स क्लास लावला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. चार वर्ष दोघांमध्येही सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. त्यानंतर अचानक यांच्या घटस्फोटाची तूफान चर्चा रंगताना दिसली आणि त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र,घटस्फोट घेण्याचे नेमके कारण काय ते कळू शकले नाही. युजवेंद्र चहल याला आपल्या कुटुंबासोबत हरियाणात राहायचे होते. पण धनश्री वर्मा हिला मुंबई राहायचे असल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसला. फक्त सक्रिय नाही तर एका आरजेसोबतही त्याचे नाव सतत जोडले जात होते. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेल. आरजे महवशसोबत युजवेंद्र अनेकदा स्पॉट देखील झाला. युजवेंद्र चहल याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना धनश्री वर्मा दिली. धनश्री सोशल मीडियावर सक्रिय असून खास व्हिडीओ शेअर करतंय.
आता घटस्फोटाच्या 11 महिन्यानंतर धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एका रिअलिटी शोमध्ये एकत्र दिसू शकतात. द 50 या रिअलिटी शोमध्ये धनश्री आणि युजवेंद्र चहल एकत्र सहभागी होतील, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. घटस्फोटानंतर दोघेही कधीच एकत्र दिसले नाहीत, मात्र या शोच्या माध्यमातून एकत्र येण्याची शक्यता आहे.
शोच्या निर्मात्यांकडून अजून याबद्दलची घोषणा करण्यात आली नाहीये. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या रिअलिटी शोमध्येही दोघेही सहभागी होणार आहेत. घटस्फोटावर दोघे नेमके काय बोलतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून युजवेंद्र चहल भारतीय क्रिकेट संघात परतण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यापूर्वी तो या शोमध्ये दिसले. द 50 प्रीमियर 10 फेब्रुवारी रोजी भारतात होईल. जिओहॉटस्टारवर प्रसारित होईल.
