AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपाय

भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरू आहे. या मालिकेत फिरकीपटूंच्या नो बॉलमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. रवींद्र जडेजा आणि सारांश जैन यांनी मिळून 10 नो बॉल टाकले.

रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपाय
रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपायImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 26, 2026 | 9:08 PM
Share

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फिरकीची जादू चालली आहे. फिरकीच्या जोरावर टीम इंडिया श्रीलंकेला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लिन स्विप देण्याच्या वेशीवर आहे. पण फिरकीची जादू चालली असताना एक डोकेदुखी मात्र वाढली आहे. कारण भारताचा अनुभव फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कसोटीत पदार्पण करणारा सारांश जैन यांच्या नो बॉलमुळे चिंता वाढली आहे. रवींद्र जडेजाचा नो बॉलमुळे एक विकेट हातची गेली. तर सारांश जैनने पहिलाच चेंडू नो टाकून कसोटी कारकि‍र्दीला सुरुवात केली. त्यामुळे हे दोन्ही फिरकीपटू फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुलेच्या रडारवर आहेत. त्यांनी ही समस्या दूर करण्यासाठी त्यांना काम करण्यास सांगितलं आहे. इतकंच काय तर मन की बात सांगितली आहे. बहुतुले यांनी सांगितलं की, कसोटी क्रिकेटमध्ये फ्री हीट नियमामुळे नो बॉल समस्येला वेसण लागू शकते.

कोलंबो कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय फिरकीपटून दोन्ही डावात मिळून 115 षटकं टाकली. सारांश जैन, मानव सुथार आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून षटकं टाकली. यात 75 षटकं रवींद्र जडेजा आणि जैन यांनी केली. या 75 षटकात दोघांनी मिळून 10 नो बॉल टाकले. यात पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 3 आणि जैनने 2 नो बॉल टाकले. तर दुसऱ्या डावात जैनने 4 आणि रवींद्र जडेजाने एक नो बॉल टाकला. या दोन्ही गोलंदाजांचा रनअप पाच ते सहा स्टेप्सचा आहे. त्यात फिरकी गोलंदाज असून नो बॉल टाकत असल्याने प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे गोलंदाजी प्रशिक्षकाने चिंता व्यक्त करणं सहाजिकच आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 2021 पासून आतापर्यंत रवींद्र जडेजाने 88 नो बॉल टाकले आहेत.

काय म्हणाले साईराज बहुतुले?

फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी मीडियासमोर सांगितलं की, हा टीमसाठी चिंतेचा विषय आहे आणि यावर काम सुरू आहे. साईराज बहुतुले म्हणाले की, ‘अनेकदा विकेट मिळत नाही तेव्हा गोलंदाज अतिरिक्त जोर लावतो. त्या प्रयत्नात नो बॉल पडतात. पण हे कारण चालणार नाही. जडेजा आणि सारांशसोबत टेक ऑफ पॉइंटवर चर्चा झाली आहे. त्यावर आता काम सुरू आहे. मी कायदे करत नाही पण जर फ्री हिट निय असेल तर नो बॉल टाकण्याचं प्रमाण घटेल.’

Follow Us
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन