कसोटी मालिकेतही टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी विजय

टी20 मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला होता. त्याचा वचपा न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही मालिकांमध्ये काढला

कसोटी मालिकेतही टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी विजय

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. यजमान संघाने सात गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाला व्हाईट वॉश दिला. एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला. (IndVNZ Christchurch test India Lost)

ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 242 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडला 235 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. त्यामुळे टीम इंडिया कसोटी मालिका बरोबरीत सोडवेल, अशी चाहत्यांना आशा वाटत होती. सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 124 धावांवर गडगडली. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 46 धावांपर्यंत मजल मारली.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांची नांगी

लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी अर्धशतकी खेळ करत किवी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. मात्र 55 धावांवर असताना जसप्रीत बुमराहने ब्लंडलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर रॉस टेलर आणि हेन्री निकोल्सच्या जोडीने न्यूझीलंडच्या विजयाचं स्वप्न साकार केलं. दुसऱ्या डावात भारताकडून बुमराहने दोन, तर उमेश यादवने एक बळी टिपला.

याआधी टी20 मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला होता. त्याचा वचपा न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही मालिकांमध्ये काढला. किवींनी वनडे मालिका 3-0 ने, तर आता कसोटी मालिकाही 2-0 ने जिंकली आहे.

IndVNZ Christchurch test India Lost

Published On - 9:18 am, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI