AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा कोलकातावर दमदार विजय, हिटमॅन रोहित म्हणाला…

हिटमॅन रोहित शर्माने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 35 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

IPL 2020, MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा कोलकातावर दमदार विजय, हिटमॅन रोहित म्हणाला...
| Updated on: Oct 17, 2020 | 12:53 AM
Share

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या मोसमातील मुंबईचा कोलकाताविरुद्धचा दुसरा विजय ठरला. याविजयसह मुंबईने पॉइंट्सटेबलमध्ये पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली. यंदाच्या मोसमातील मुंबईचा हा सलग पाचवा विजय ठरला.  क्विंटन डी कॉक मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. डी कॉकने मुंबईकडून नाबाद 78 धावा केल्या. या खेळीसाठी डी कॉकला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. दरम्यान या विजयानंतर कर्णधार हिटमॅन रोहितने प्रतिक्रिया दिली आहे. After the win against Kolkata, hitman Rohit Sharma praised the Mumbai players

रोहित काय म्हणाला?

“विजयी आव्हानाचं पाठलाग करणं नेहमीच विशेष राहिलं आहे. विजयी लक्षाचं पाठलाग करताना विजय मिळवल्यानंतर संघाचा आत्मविश्वास आणखी दुणावतो. आम्ही यंदाच्या मोसमातील पहिल्या टप्प्यात फार कमी वेळा विजयी आव्हानाचं पाठलाग केले. कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात आम्ही बॅटिंग आणि बोलिंग या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. आम्ही सामन्यावर सुरुवातीपासून घट्ट पकड बनवून ठेवली होती. तसेच आम्ही केलेली रणनितीही यशस्वी ठरली”, असं रोहित म्हणाला.

गोलंदाजांच कौतुक

रोहितने फिरकीपटू कृणाल पांड्या आणि राहुल चहर यांचं तोंडभरुन कौतुक केलं. “कृणाल पांड्या आणि राहुल चहर या दोघांच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताने लोटांगण घातलं. तसेच चहरने आठव्या ओव्हरमध्ये सलग 2 चेंडूत घेतलेल्या 2 विकेट्समुळे कोलकाता बॅकफुटवर गेली. सोबतच आंद्रे रसेल या आक्रमक फलंदाजाविरोधात जसप्रीत बुमराह यशस्वी ठरेल, असा विश्वास मला होता. तो विश्वास बुमराहने खरा ठरवला. तसेच रसेलविरुद्ध ठरवलेली रणनिती यशस्वी ठरली”, असंही रोहितने नमूद केलं.

“बॅटिंगचा आनंद घेतला”

“मला क्विंटन डी कॉक सोबत बॅटिंग करायला नेहमी मजा येते. डी कॉक नेहमीच निर्धास्तपणे तसेच आक्रमकपणे खेळतो. त्यामुळे मी संथपणे खेळत क्विंटनला चांगली साथ देतो”, असंही रोहित म्हणाला.

सामन्याचा लेखाजोखा

कोलकाताने टॉस जिंकून फंलदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताची खराब सुरुवात झाली. कोलकाताने 10.4 ओव्हरमध्ये 61 धावांवर 5 विकेट गमावल्या. कोलकाता संकटात असताना इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 87 धावा जोडल्या. यामध्ये पॅटने नाबाद 53 तर तर कर्णधार मॉर्गनने 39 धावा केल्या. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावत 148 धावा केल्या. यामुळे मुंबईला 149 धावांचे आव्हान मिळाले.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या मुंबईची धमाकेदार सुरुवात झाली. मुंबईच्या क्विटंन डी कॉक आणि रोहित शर्मा या जोडीने 94 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान क्विटंन डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्मा 35 धावांवर असताना बाद झाला. यानंतर सूर्यकुमारही आऊट झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि क्विटंन डी कॉक जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. मुंबईने हे विजयी आव्हान 16.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पूर्ण केलं. या विजयासह मुंबईने 12 पॉइंट्ससह पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs KKR : शानदार, जबरदस्त ! सूर्यकुमार यादवचा अफलातून कॅच, ट्रेन्ट बोल्टच्या 50 विकेट्स पूर्ण

After the win against Kolkata, hitman Rohit Sharma praised the Mumbai players

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.