IPL 2020, DC vs RCB : अजिंक्य रहाणे-शिखर धवनची अर्धशतकी खेळी, दिल्लीची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात

IPL 2020, DC vs RCB : अजिंक्य रहाणे-शिखर धवनची अर्धशतकी खेळी, दिल्लीची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात

दिल्लीने बंगळुरुचा पराभव करत पॉइट्संटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

sanjay patil

|

Nov 02, 2020 | 11:39 PM

अबुधाबी : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह दिल्ली प्ले ऑफमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. बंगळुरुने दिल्लीला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 4 विकेट्स गमावून 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. दिल्लीने 154 धावा केल्या. दिल्लीकडून अजिंक्य रहाणे 60 तर शिखर धवनने 54 धावांची खेळी केली. बंगळुरुकडून शहबाज अहमदने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतला. ipl 2020 dc vs rcb live score update today cricket match delhi capitals vs royal challengers bangalore  स्कोअर

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या दिल्लीला 19 धावांवर पहिला धक्का बसला. पृथ्वी शॉने आजही निराशा केली. पृथ्वी 9 धावांवर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. शिखर-अजिंक्य या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान शिखरने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र यानंतर शिखर 54 धावांवर बाद झाला. शिखरने 41 चेंडूत 6 फोरच्या मदतीने 54 धावा केल्या.

शिखरनंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. मात्र श्रेयसला मैदानात टिकता आले नाही. श्रेयसला शहबाज अहमदने 7 धावांवर बाद केलं. यानंतर अजिंक्य रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र लेग स्वीप मारण्याच्या नादात अजिंक्य बाद झाला. अजिंक्यने 46 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 60 धावा केल्या. यानंतर मैदानात असलेल्या ऋषभ पंत-मार्कस स्टोयनिसने दिल्लीला विजय मिळवून दिला. पंत 8 तर मार्कस 10 धावांवर नाबाद राहिले.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. बंगळुरुकडून सलामीवीर देवदत्त पडीक्कलने 41 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. मिस्टर 360 एबी डी व्हीलियर्सने 21 चेंडूत 35 धावांची तडाखेदार खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने 24 चेंडूत 29 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडाने 2 विकेट्स मिळवल्या. तर रवीचंद्रन आश्विनने 1 बळी मिळवला.

पराभवानंतरही क्वालिफाय

दिल्लीने बंगळुरुचा 6 विकेट्सने पराभव केला. मात्र या पराभवानंतरही बंगळुरुने प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. बंगळुरु प्ले ऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. बंगळुरुने नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे प्ले ऑफमधील 3 संघ ठरले आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु अनुक्रमे पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

[svt-event title=”दिल्लीचा शानदार विजय” date=”02/11/2020,11:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 12 चेंडूत 14 धावांची आवश्यकता” date=”02/11/2020,10:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला चौथा धक्का” date=”02/11/2020,10:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला तिसरा धक्का” date=”02/11/2020,10:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 24 चेंडूत 25 धावांची आवश्यकता” date=”02/11/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजिंक्य रहाणेचे अर्धशतक” date=”02/11/2020,10:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गब्बर आऊट” date=”02/11/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गब्बर अर्धशतक” date=”02/11/2020,10:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 11 ओव्हरनंतर” date=”02/11/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 5 ओव्हरनंतर” date=”02/11/2020,9:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला धक्का” date=”02/11/2020,9:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात” date=”02/11/2020,9:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 153 धावांचे आव्हान” date=”02/11/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ] बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलची अर्धशतकी खेळी, एबी डी व्हीलियर्सची फटकेबाजी [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या 20 ओव्हरमध्ये 152 धावा” date=”02/11/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला सातवा झटका” date=”02/11/2020,9:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला सहावा झटका” date=”02/11/2020,9:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पाचवा झटका” date=”02/11/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 18 ओव्हरनंतर” date=”02/11/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला चौथा धक्का ” date=”02/11/2020,8:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”3 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”02/11/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात” date=”02/11/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”02/11/2020,7:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असा आहे बंगळुरुचा संघ” date=”02/11/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”02/11/2020,7:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला ” date=”02/11/2020,7:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

हा सामना जिंकणारा संघ थेट प्ले ऑफमध्ये पोहचेल. यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ चा असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. पॉइंट्सटेबलमध्ये बंगळुरु आणि दिल्ली अनुक्रमे 14 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमावर आहेत. या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याआधी 5 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडले होते. या सामन्यात दिल्लीने बंगळुरुवर 59 धावांनी विजय मिळवला होता.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, पृथ्वी शॉ, मार्क्स स्टोयनिस, ललित यादव, रवीचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, किमो पॉल, डेनियल सॅम्स, एलेक्स कॅरी, ऋषभ पंत, कगिसो रबाडा, संदीप लामिछाने, ईशांत शर्मा, मोहित शर्मा, आवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, अमित मिश्रा आणि एनरिक नोर्तजे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, अॅरॉन फिंच, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, एडम झॅम्पा, इसुरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RCB vs DC : दिल्लीचा दणदणीत विजय, बंगळुरुवर 59 धावांनी मात

ipl 2020 dc vs rcb live score update today cricket match delhi capitals vs royal challengers bangalore

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें