AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, KXIP vs DC : मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

तुषार देशपांडेने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 2 ओव्हर टाकल्या.

IPL 2020, KXIP vs DC : मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
| Updated on: Oct 21, 2020 | 12:27 AM
Share

दुबई : किंग्जसने इलेव्हन पंजाबने (Kings Eleven Punjab) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान पंजाबने 5 विकेट्स गमावून 1 ओव्हरआधीच पूर्ण केले. पंजाबने एकूण 167 धावा केल्या. दिल्ली संघातील मराठमोळा तुषार देशपांडे महागडा गोलंदाज ठरला. तुषारने 2 ओव्हर टाकल्या. यात त्याने तब्बल 20.50 च्या इकॉनामी रेटने 41 धावा लुटवल्या. यासह तुषारच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. IPL 2020 Delhi Capitals Tushar Deshpande Sets Bad Record Against KXIP

काय आहे विक्रम?

तुषारच्या नावावर पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा देण्याच्या नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. तुषारने सामन्यातील 5 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने तुषारचा चांगलाच समाचार घेतला. ख्रिस गेलने तुषारच्या या ओव्हरमध्ये 26 धावा कुटल्या. यामध्ये गेलने 3 फोर आणि 2 सिक्सर लगावले.

तुषारच्या आधी यंदाच्या मोसमात पावरप्लेमध्ये 1 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम खलील अहमदच्या नावावर होता. खलीलने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पावरप्लेच्या ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या होत्या. पावरप्ले ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा ट्रेन्ट बोल्ट आहे. बोल्टने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 1 ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अनेक दिग्गज गोलंदाजांना उपट पडली आहे. यामध्ये कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि डेल स्टेन सारख्या गोलंदाजांनी आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 50 पेक्षा धावा दिल्या आहेत. तसेच पंजाबच्या शेलडॉन कॉट्रेलच्या बोलिंगवर राजस्थानच्या राहुल तेवतियाने 5 सिक्स लगावले होते. शेल्डॉनने त्याच्या एकूण 3 ओव्हरमध्ये एकूण 52 धावा दिल्या होत्या.

दरम्यान या सामन्यात दिल्लीच्या शिखर धवनने नाबाद शतकी खेळी. याखेळी दरम्यान शिखरने किर्तीमान केला. धवनने आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या. यासह शिखर आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला.

पंजाबची पॉइंट्सटेबलमध्ये झेप

पंजाबने दिल्लीला नमवत पॉइ्ंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीविरुद्धचा या विजयासह पंजाबने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. तसेच पंजाबने चांगले कमबॅकही केले आहे. पंजाबने या विजयासह प्लेऑफमधील आव्हान कायम राखले आहे. पंजाब आपला आगामी सामना 24 सप्टेंबरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs DC : शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सने मात

IPL 2020 | DCvKXIP : शिखर धवनकडून विक्रमांचा पाऊस

IPL 2020 Delhi Capitals Tushar Deshpande Sets Bad Record Against KXIP

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.