Chris Gayle | रागाच्या भरात बॅट फेकणाऱ्या ख्रिस गेलकडून नियमांचं उल्लंघन, दंडात्मक कारवाई

या सामन्यात राजस्थानने पंजाबवर 7 विकेट्सने विजय मिळवला.

Chris Gayle | रागाच्या भरात बॅट फेकणाऱ्या ख्रिस गेलकडून नियमांचं उल्लंघन, दंडात्मक कारवाई
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 11:40 PM

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 50 वा सामना किंग्जस इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थानने पंजाबवर 7 विकेट्सने विजय मिळवला. मैदानात नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असणारा ख्रिस गेल (Chris Gayle) यासामन्यादरम्यान भडकलेला पाहायला मिळाला. या मॅचमध्ये गेलचे अवघ्या 1 धावेने अर्धशतक हुकले. गेल 99 धावांवर असताना क्लिन बोल्ड झाला. गेलने शतक हुकल्याच्या रागात भर मैदानात बॅट फेकून दिली. यामुळे गेलकडून आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन झालं. यामुळे गेलला दंड ठोठावण्यात आला आहे. IPL 2020 KXIP vs RR Universe Boss Chris Gayle Fined For Throwing a Bat In Anger

https://twitter.com/ipl2020highlite/status/1322206700695244801

नक्का काय झालं?

सामन्यातील शेवटची म्हणजेच 20 वी ओव्हर जोफ्रा आर्चरने टाकली. दमदार कामगिरी करत असलेला गेल 99 धावांवर खेळत होता. शतकासाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता होती. जोफ्रा आर्चरने अचूक यॉर्कर बॉल टाकला. यावर गेल 99 धावांवर क्लीन बोल्ड झाला. आऊट झाल्याच्या रागातून गेलने बॅट फेकून दिली. यामुळे सामनाधिकाऱ्यांनी गेलला दंड ठोठावला. गेलकडून आयपीएलच्या 2.2 या नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे सामनाधिकाऱ्यांनी गेलवर दंडात्मक कारवाई केली. गेलला एकूण सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला. गेलने स्वत:कडून झालेली चूक मान्य केली.

या मोसमातील तिसरे अर्धशतक

यंदाच्या मोसमातील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर गेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. मात्र यानंतरही गेलने आपली आक्रमक शैली कायम ठेवत दमदार आगमन केले. गेलला पंजाबच्या आठव्या सामन्यात संधी देण्यात आली. गेलने आपल्या पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. गेलला टीममध्ये घेतल्यानंतर पंजाबला फक्त एकदाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेलने यंदाच्या मोसमातील एकूण 6 सामन्यात 275 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच एकूण 23 लांबलचक षटकारही खेचले आहेत.

टी-20 मध्ये 1000 सिक्स

गेल आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गेलने एक पराक्रम केला. गेलने राजस्थानविरुद्ध 6 चौकार आणि 8 षटकार ठोकले. गेलने यासह टी 20 क्रिकेटमध्ये 1000 सिक्स मारण्याचा अफलातून विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा गेल हा एकमेव फलंदाज ठरला आहे. कायरन पोलार्ड टी 20 मध्ये सर्वाधिक सिक्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने आतापर्यंत एकूण 690 सिक्सर मारले आहेत.

संबंधित बातम्या :

Chris Gayle | षटकारांचा बादशाह ख्रिस गेलचा नवा विक्रम, T20 मध्ये एक हजार षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

IPL 2020, MI vs RCB : ख्रिस मॉरिस-हार्दिक पांड्या भिडले, नियमांचं उल्लंघन

IPL 2020 KXIP vs RR Universe Boss Chris Gayle Fined For Throwing a Bat In Anger

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.