IPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं

पंजाबविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुकडून अनेक चुका झाल्या. | ( rcb lost to punjab for three main reasons )

IPL 2020, KXIP vs RCB  : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं

दुबई : लोकेश राहुलच्या ( Lokesh Rahul ) नेतृत्वाखाली किंग्ज इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab ) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ( Royal Challengers Bangalore ) 97 धावांनी दणदणीत पराभव केला. यासह पंजाबचा या मोसमातील हा पहिला विजय ठरला. कॅप्टन लोकेश राहुल पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 69 बॉलमध्ये 132 धावांची नाबाद तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ( rcb lost to punjab for three main reasons )

या सामन्यात बंगळुरुकडून अनेक चुका झाल्या. याच काही चुकांमुळेच बंगळुरुने पंजाबविरोधातील हा सामना गमावल्याचं म्हटलं जातंय. बंगळुरुकडून सामन्यादरम्यान नक्की काय चुकलं, त्याचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

गेल्या काही सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या संघाचा पराभव झाला आहे. हीच चूक बंगळुरुने केली. बंगळुरुने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकली. मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरला. साधारणपणे कोणताही संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास पंसती देतो.

खराब क्षेत्ररक्षण

बंगळुरुच्या पराभवांचं दुसरं कारण म्हणजे खराब फिल्डिंग. या सामन्यात आरसीबीच्या कर्णधाराने म्हणजेच विराट कोहलीने केएल राहुलच्या चक्क दोन कॅच सोडल्या. याचाच फटका बंगळुरुला बसला. राहुल 83 धावांवर असताना विराटने त्याची कॅच सोडली. विराटची ही चूक बंगळुरुला चांगलीच महागात पडली. राहुलने या संधीचा चांगलाच फायदा घेत शतकी कामगिरी केली. त्याने 69 बॉलमध्ये 132 धावा केल्या. विशेष म्हणजे राहुलने शेवटच्या 9 बॉलमध्ये 40 पेक्षा अधिक धावा ठोकल्या.

पंजाबच्या फिरकीसमोर बंगळुरु फुस्स

पंजाबच्या फिरकीपटूंसमोर बंगळुरुच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. बंगळुरुच्या कोणत्याही खेळाडूला नीट खेळता आले नाही. पंजाबच्या मुरगन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी दमदार कामगिरी केली. अश्विन-बिश्नोई या फिरकी जोडीने एकूण 6 विकेट घेतल्या. या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. या फिरकीपटुंचा सामना कसा करायचा, याबाबत बंगळुरुने कोणतीच रणनिती केली नसल्याने आरसीबीला अपयश आले.

संबंधित बातम्या : 

धोनीचा ‘वर्ल्डकप विनिंग’ सिक्सर झेलणारा क्रिकेट रसिक सापडला, गावस्करांमुळे नऊ वर्षांनी शोध

Dean Jones | IPL कॉमेंट्रीसाठी मुंबईत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचा मृत्यू

( rcb lost to punjab for three main reasons )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *