IPL 2020, KXIP vs RCB : किंग्ज इलेव्हन पंजाबचा बंगळुरुवर 97 धावांनी दणदणतीत विजय

पंजाबकडून शतकी कामगिरी करणारा केएल राहुल सामनावीर ठरला. | (KXIP vs RCB Live Score Updates)

IPL 2020, KXIP vs RCB : किंग्ज इलेव्हन पंजाबचा बंगळुरुवर 97 धावांनी दणदणतीत विजय

दुबई : किंग्ज इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ( Royal Challengers Bangalore ) 97 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाबने बंगळुरुला विजयासाठी 207 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुला अवघ्या 109 धावाच करत्या आल्या. बंगळुरुचा संपूर्ण संघ 17 ओव्हरमध्येच ऑल आऊट झाला. बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 30 धावा केल्या. एबीडी व्हिलियर्सने 28 धावा केल्या. (KXIP vs RCB Live Score Updates)

बंगळुरुच्या 5 खेळाडूंना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर जोश फिलिप आणि उमेश यादव भोपळा न फोडताच माघारी परतले. पंजाबकडून रवि बिश्नोई आणि मुर्गन आश्विन या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर शेल्डॉन कॉट्रेलने 2 विकेट्स घेतल्या.

विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या बंगळुरुची खराब सुरुवात झाली. पंजाबच्या बोलर्सनी बंगळुरुला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. बंगळुरुला पहिला झटका पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर लागला. देवदत्त पडीक्कल 1 धावा करुन बाद झाला. यानंतर पुढील ओव्हरमध्येच जोश फिलिप एलबीडबल्यू झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर मैदानात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आला. कोहलीने सपशेल निराशा केली. कोहली अवघी 1 धाव करुन बाद झाला. त्यामुळे बंगळुरुची 4 धावांवर – 3 विकेट अशी बिकट अवस्था झाली होती.

यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्सच्या मदतीने अरॉन फिंचने बंगळुरुचा घसरलेला डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फार यश आले नाही. फिंचही 20 धावा करुन तंबूत परतला. यानंतर एबी डिव्हिलर्सने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फार वेळ तो मैदानात तग धरु शकला नाही. डीव्हिलियर्सही 28 धावा करुन माघारी परतला. यानंतर बंगळुरुने ठराविक अंतराने विकेट गमावले. पंजाबकडून रवि बिश्नोई आणि मुर्गन आश्विनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

त्याआधी बंगळरुने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंग करण्यास भाग पाडले. फलंदाजी करायला आलेल्या पंजाबची दमदार सुरुवात राहिली. पहिल्या विकेटसाठी मयंक अगरवाल आणि कर्णधार लोकेश राहुल ( Lokesh Rahul ) यांच्यात 57 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. यानंतर मयंक अगरवाल 26 धावा करुन बाद झाला. यानंतर आलेल्या निकोलस पूरणच्या सोबतीने लोकेश राहूलने तडाखेदार खेळी सुरु ठेवली.

पूरणसोबत राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 57 धावा जोडल्या. यानंतर निकोलस पूरणही बाद झाला. त्याने 17 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला विशेष काही करता आले नाही. मॅक्सवेल 5 धावा करुन बाद झाला. एका बाजूला विकेट जात असताना राहुल मैदानात उभा होता. लोकेश राहुलने करुण नायरसोबत बंगळुरुच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान विराटने केएल राहुलच्या दोन कॅच सोडल्या. याचाच फायदा राहुलने घेतला.

राहुल सातत्याने फटकेबाजी करत होता. यादरम्यान त्याने आपले शतक पूर्ण केले. केएल राहुलने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर राहुलने आणखी जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली. राहुलने 69 बॉलमध्ये एकूण नाबाद 132 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 सिक्स आणि 14 चौकार लगावले. बंगळुरुकडून शिवम दुबेने 2 तर युजवेंद्र चहलने 1 विकेट घेतली. (KXIP vs RCB Live Score Updates)

लाईव्ह स्कोअरसाठी क्लिक करा

[svt-event title=”किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजय” date=”24/09/2020,11:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची नववी विकेट” date=”24/09/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची आठवी विकेट” date=”24/09/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची सातवी विकेट” date=”24/09/2020,10:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आरसीबीला सहावा दणका ” date=”24/09/2020,10:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या 10 ओव्हरनंतर धावा” date=”24/09/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एबी डी व्हिलियर्स बाद ” date=”24/09/2020,10:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला चौथा दणका” date=”24/09/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डीव्हिलियर्सने बंगळुरुचा डाव सावरला” date=”24/09/2020,10:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला तिसरा दणका” date=”24/09/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का” date=”24/09/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची खराब सुरुवात” date=”24/09/2020,9:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 207 धावांचं आव्हान” date=”24/09/2020,9:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”19 व्या ओव्हरमध्ये 26 धावा ” date=”24/09/2020,9:17PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : पंजाब : 183-3, ( 19 over) करुण नायर – 8*, लोकेश राहुल -116* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-kxip-vs-rcb-live-score-updates-today-cricket-match-kings-xi-punjab-vs-royal-challengers-bangalore-272290.html #IPL2020 #rcbvskxip [/svt-event]

[svt-event title=”कर्णधार लोकेश राहुलचे शतक ” date=”24/09/2020,9:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 16 ओव्हरनंतर ” date=”24/09/2020,9:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला तिसरा दणका ” date=”24/09/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबची 15 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”24/09/2020,8:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला दुसरा झटका ” date=”24/09/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी ” date=”24/09/2020,8:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकेश राहुलचे अर्धशतक” date=”24/09/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबची 10 ओव्हरनंतर धावसंख्या ” date=”24/09/2020,8:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”9 ओव्हरनंतर पंजाबची धावसंख्या” date=”24/09/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पहिला धक्का ” date=”24/09/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर ” date=”24/09/2020,8:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”50 धावांची सलामी भागीदारी” date=”24/09/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचा 4 ओव्हरनंतर स्कोअर” date=”24/09/2020,7:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या ओव्हरनंतर पंजाबचा स्कोअर” date=”24/09/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पहिल्या ओव्हरनंतर पंजाबची धावसंख्या” date=”24/09/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू ” date=”24/09/2020,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचे 11 शिलेदार” date=”24/09/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचे अंतिम 11 खेळाडू ” date=”24/09/2020,7:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुने टॉस जिंकला ” date=”24/09/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ] https://twitter.com/IPL/status/1309123807462989826 [/svt-event]

[svt-event title=”टॉस कोण जिंकणार ? ” date=”24/09/2020,6:37PM” class=”svt-cd-green” ] नाणेफेकीसाठी अवघे काही मिनिटं बाकी आहेत. [/svt-event]

[svt-event title=”हेड टू हेड” date=”24/09/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ] आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब आणि बंगळुरु एकूण 24 वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. [/svt-event]

पंजाब आणि बंगळुरु या दोन्ही संघांनी या मोसमातील पहिला सामना खेळला आहे. बंगळुरुने हैदराबादचा 10 धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. तर पंजाबचा दिल्लीविरुद्धातील पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे पंजाब पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असेल. तर दुसऱ्या बाजूला बंगळुरु विजयी घौडदौड कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI