K L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम

के एल राहुलने (KL Rahul) 132 धावांची शतकी खेळी केली. या वादळी खेळीद्वारे राहुलने आयपीएलमधील 3 विक्रम त्याच्या नावावर केले. (KL Rahul breaks three records with century)

K L Rahul |  के एल राहुलचं वादळ,  69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम

अबुधाबी- किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के एल राहुलने (KL Rahul) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) विरुद्ध धुवांधार फलंदाजी करत 69 चेंडूत 132 धावांची शतकी खेळी केली. या वादळी खेळीद्वारे राहुलने आयपीएलमधील 3 विक्रम त्याच्या नावावर केले. राहुलच्या खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघाने 3 बाद 206 धावा केल्या. (KL Rahul breaks three records with century)

राहुलने 132 धावांच्या वादळी खेळीत 7 षटकार आणि 14 चौकार लगावले. राहुलने त्याचे शतक षटकार खेचत पूर्ण केले. IPL मध्ये राहुलचे हे दुसरे शतक ठरले. पंजाबकडून शतकी कामगिरी करणारा के एल राहुल सामनावीर ठरला.

राहुलने त्याच्या नावावर केलेले 3 विक्रम

IPL मध्ये भारतीय खेळाडूने एका डावात सर्वाधिक 132 धावा करण्याचा विक्रम राहुलने केला. यापूर्वी हा विक्रम रिषभ पंत याच्या नावावर होता. 2018 च्या मोसमात त्याने 128 धावा केल्या होत्या. आयपीएलमधील एखाद्या संघाचा कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही राहुलने केला.

राहुलने आयपीएलमधील 60 व्या सामन्यात 2000 धावसंख्येचा टप्पा ओलांडला. सचिन तेंडूलकरने 2 हजार धावा 63 सामन्यांमध्ये केल्या होत्या. संपूर्ण आयपीएलचा विचार केल्यास ख्रिस गेलने 48 सामन्यात तर शॉन मार्शने 52 सामन्यात 2 हजार धावा केल्या आहेत.

दरम्यान, पंजाबने बंगळुरुला विजयासाठी 207 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुला अवघ्या 109 धावाच करत्या आल्या. बंगळुरुचा संपूर्ण संघ 17 ओव्हरमध्येच ऑल आऊट झाला.किंग्ज इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ( Royal Challengers Bangalore ) 97 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

6  सामन्यानंतर  पंजाबचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाबकडून रवि बिश्नोई आणि मुर्गन आश्विन या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर शेल्डॉन कॉट्रेलने 2 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या:

IPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : किंग्ज इलेव्हन पंजाबचा बंगळुरुवर 97 धावांनी दणदणतीत विजय

IPL 2020, KXIP vs RCB | पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी बंगळुरुला मोठा धक्का, ख्रिस मॉरिस दुखापतीमुळे सामन्याला मुकणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *