IPL 2020, KXIP vs RCB | पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी बंगळुरुला मोठा धक्का, ख्रिस मॉरिस दुखापतीमुळे सामन्याला मुकणार

बंगळुरुचे संचालक माईक हेसन यांनी याबाबत माहिती दिली आहे.| Royal Challengers Bangalore Chris Morris Unfit

IPL 2020, KXIP vs RCB | पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी बंगळुरुला मोठा धक्का, ख्रिस मॉरिस दुखापतीमुळे सामन्याला मुकणार

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील सहावा सामना आज (24 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Xi Punjab) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात हा सामना होणार आहे. या सामन्याच्या सुरुवातीआधीच बंगळुरुला धक्का लागला आहे. बंगळुरुचा ऑलराऊंडर खेळाडू ख्रिस मॉरीसला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागणार आहे. मॉरीसला सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधातही दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. (Royal Challengers Bangalore Chris Morris Unfit )

ख्रिस मॉरीस पंजाब विरुद्ध खेळण्यासाठी फीट नसल्याची माहिती टीम मॅनेजमेंटकडून देण्यात आली आहे. बंगळुरुचे संचालक माईक हेसन (Mike Hesson) यांनी याबाबत माहिती दिली आहे. “मॉरिस अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. तो अजूनही डॉक्टरांच्या निगरानीखाली आहे. त्याला दुखापतीमुळे पंजाब विरोधातील दुसऱ्या सामन्यात खेळता येणार नाही. मॉरिस डेथ ओव्हर्समध्ये बॅटिंग आणि बॉलिंग करण्यात माहीर आहे,” असं माईक हेसन म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “मॉरीसच्या दुखापतीमुळे बंगळुरुच्या संतुलनात गडबड झाली आहे. मॉरीस अष्टपैलू खेळाडू आहे. मॉरीस बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा तीनही आघाड्यांवर चांगली कामगिरी करतो. तो तीन खेळाडूंची भूमिका एकाट पार पाडतो. पुढील सामना खेळण्यासाठी मॉरीस पूर्णपणे फीट असेल, असा आशावाद हेसन यांनी व्यक्त केला.

ख्रिस मॉरीस हा अनेक महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. बंगळुरुने मॉरीससाठी 10 कोटी रुपये मोजले आहेत. दरम्यान बंगळुरुने आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सुरुवात विजयाने केली आहे. बंगळुरुने पहिल्या सामन्यात हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला होता.

संबंधित बातमी :

KXIP vs RCB | ‘शॉर्ट रन’चा वाद विसरुन आरसीबी मैदानात उतरणार, किंग्ज इलेव्हन पंजाबशी भिडणार

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का, दुखापतीमुळे मिचेल मार्श स्पर्धेबाहेर

(Royal Challengers Bangalore Chris Morris Unfit )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *