IPL 2021 : हार्दिक पांड्याच्या ‘रॉकेट थ्रो’ने हैदराबादच्या स्वप्नांचा चक्काचूर, इथेच फासा पलटला, पाहा व्हिडीओ…

कर्णधार डेव्हिड वॉर्नर चांगला खेळत होता. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात त्याला तंबूत जायला लागलं. हार्दिक पांड्याच्या 'रॉकेट थ्रो'ने त्याचं काम तमाम झालं. (IPL 2021 MI vs SRH Hardik pandya Rocket Throw David Warner Out Hydrabad lose Match)

IPL 2021 : हार्दिक पांड्याच्या 'रॉकेट थ्रो'ने हैदराबादच्या स्वप्नांचा चक्काचूर, इथेच फासा पलटला, पाहा व्हिडीओ...
कर्णधार डेव्हिड वॉर्नर चांगला खेळत होता. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात त्याला तंबूत जायला लागलं. हार्दिक पांड्याच्या 'रॉकेट थ्रो'ने त्याचं काम तमाम झालं.
Akshay Adhav

|

Apr 18, 2021 | 6:56 AM

चेन्नई :  कोणत्याही परिस्थितीत मुंबई पलटणला (Mumbai Indians) मात द्यायचीच, याच इराद्याने डेव्हिड वॉर्नरची (David Warner) ऑरेंज आर्मी हैदराबादच्या (Hydrabad) एम ए चिदंबरम स्टेडियमवर उतरली होती. मुंबईला 150 धावांवर रोखून आणि बेअरस्टो-वॉर्नर जोडीने दणक्यात सुरुवात करुन यातील 50 टक्के काम फत्तेही केलं होतं. पण मुंबईचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) एका थ्रो ने हैदराबादच्या तसंच डेव्हिड वॉर्नरच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. (IPL 2021 MI vs SRH Hardik pandya Rocket Throw David Warner Out Hydrabad lose Match)

पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबईच्या 150 धावा

मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायचं ठरवलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि डावखुरा क्विंटन डिकॉकने (Quiton De cock) डावाची सुरुवात अतिशय धडाक्यात केली. पहिल्या बॅटिंग पॉवरप्लेवर मुंबईने राज्य केलं. 36 चेंडूत मुंबईने 53 धावा धावफलकावर लावल्या. मात्र धावगती वाढवण्याच्या नादात रोहित शर्मा आऊट झाला. नंतर हैदराबादचा हुकमी एक्का राशीद खान आणि मुजीब रहमानने मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. इशान, सुर्या आणि हार्दिकला फार चमकदार कामगिरी करता आला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये कायरन पोलार्डने 17 धावा काढल्या. त्यामुळे मुंबईला 150 चा आकडा गाठता आला.

तिथेच हैदराबादच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला…

प्रत्युत्तरादाखल हैदराबादच्या डावाची सुरुवात अतिशय आक्रमक झाली.  हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो आज वेगळ्या अंदाजात दिसून येत होता. त्याने पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. केवळ 22 चेंडूत त्याने 43 धावांची आक्रमक खेळी केली. कृणालच्या बोलिंवर तो हिट विकेट झाला. दुसरीकडे कर्णधार डेव्हिड वॉर्नर चांगला खेळत होता. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात त्याला तंबूत जायला लागलं. हार्दिक पांड्याच्या ‘रॉकेट थ्रो’ने त्याचं काम तमाम झालं.

वॉर्नरला एक धाव घेणं माघात, जिसे डरते थे वहीं बात हो गयीं!

वॉर्नर एक धाव घ्यायला गेला पण ही धाव त्याला भलतीच महागात पडली. त्याने 36 धावांचे योगदान दिलं. तो जर शेवटपर्यंत पीचवर राहिला असता तर हैदराबादला सहज विजय मिळाला असता. साहजिक वॉर्नर आऊट झाल्याने हैदराबादचा पराभव तिथेच नक्की झाला. जिसे डरते थे वहीं बात हो गयी… बेअरस्टो आणि वॉर्नर दोघांव्यतिरिक्त हैदराबादच्या कोणत्याही फलंदांजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. शेवटी हैदराबादचा सलग तिसरा पराभव झाला तर मुंबईने सलग दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

मुंबईची टिच्चून गोलंदाजी

आजच्या सामन्यात मुबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत 150 धावांचा बचाव केला. मुंबईकडून राहुल चाहरने 4 षटकात 19 धावा देत 3 तर ट्रेंट बोल्टने 3.4 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. बुमराह आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर हार्दिक पंड्याने हैदराबादच्या दोन फलंदाजांना धावबाद केलं.

मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिलं होतं. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने 32 धावांची खेळी केली. तसेच कायरन पोलार्डने नाबाद 35 रन्स केल्या. हैदराबादकडून मुजीब उर रेहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(IPL MI vs SRH Hardik pandya Rocket Throw David Warner Out Hydrabad lose Match)

हे ही वाचा :

MI vs SRH, IPL 2021 Match 9 Result | हैदराबादचा सलग तिसरा पराभव, मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय

MI v SRH IPL 2021, Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें