AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 | “अष्टपैलू बेन स्टोक्सला ‘मुंबई इंडियन्स’च्या ताफ्यात घ्या”

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) लवकरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

IPL 2021 | अष्टपैलू बेन स्टोक्सला 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात घ्या
अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स
| Updated on: Jan 26, 2021 | 1:25 PM
Share

मुंबई : अवघ्या काही दिवसांमध्ये आयपीएलच्या आगामी मोसमासाठी (IPL 2021) लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेत अनेक खेळाडूंवर फ्रंचायजींचे लक्ष असणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी सर्व फ्रंचायजीने रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals)धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला (Ben Stokes) कायम राखले आहे. मात्र त्यानंतरही बेन स्टोक्सला मुंबई संघासाठी खरेदी करा, अशी मागणी एका क्रिकेट चाहत्याने केली आहे. राजस्थान रॉयल्सने केलेल्या एका ट्विटवर कमेंट करत या चाहत्याने ही मागणी केली आहे. (ipl 2021 mumbai indians fans demanded to trade rajasthan royals all rounder ben stockes)

मुंबईकडे अनेक आक्रमक आणि गेमविनर खेळाडू आहेत. यामध्ये कृणाल पंड्या, कायरॉन पोलार्ड, रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक,सूर्यकुमार यादव आणि इशान किशन सारखे तगडे खेळाडू आहेत. यानंतरही या पठ्ठ्याला मुंबईत बेन स्टोक्स हवा आहे. चाहत्याच्या या कमेंटला राजस्थान रॉयल्सने गंमतीशीर प्रत्युत्तर दिलं आहे. नाही,हे अजिबात होऊ शकत नाही, असं म्हणणारी एक gif त्यांनी शेअर करत त्या चाहत्याला उत्तर दिलं आहे.

दरम्यान राजस्थानने कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीज केलं आहे. तर संजू सॅमसनला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या 14 व्या मोसमात सॅमसन राजस्थानचे नेतृत्व करणार आहे.

राजस्थानने रिटेन आणि रिलीज केलेले खेळाडू

बेन स्टोक्स, संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, जयदेव उनाडकट, अँड्र्यू टाय, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत आणि यशस्वी जयस्वाल.

Rajsthan Royals Players Released

स्टीव्ह स्मिथ, वरुण आरोन, टॉम कुरन, अंकित राजपूत, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग, ओशाणे थॉमस, आकाश सिंग

स्टोक्सची आयपीएल कारकिर्द

स्टोक्स आयपीएलमध्ये 14 व्या मोसमापर्यंत एकूण 42 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 135. 09 च्या स्ट्राईक रेटने 2 शतक आणि 2 अर्धशतकांसह 920 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने हे 2 शतक सामन्याच्या दुसऱ्या डावात विजयी आव्हानाचं पाठलाग करताना लगावले आहेत. नाबाद 107 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने एकूण 28 विकेट्सही घेतल्या आहेत. 15 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दरम्यान या आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी इंग्लंडचा संघ भारताविरोधात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने 5 फेब्रुवारीपासून होणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL Retained and Released Players 2021 : लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

Ben Stokes | आयपीएलमधील दुसरी नाबाद शतकी खेळी, बेन स्टोक्सचा पराक्रम, ठरला एकमेव खेळाडू

Sri Lanka vs England, 2nd Test | जो रुटची विक्रमाला गवसणी, 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

(ipl 2021 mumbai indians fans demanded to trade rajasthan royals all rounder ben stockes)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.