AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलार्डचा जलवा सुरु, IPL 2021 मोसमातील सगळ्यात लांब षटकार, पाहा पोलार्डच्या बॅटमधल्या ‘जादू’चा Video  

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा वेगवान फलंदाज कायरन पोलार्डने (Kieron Pollard) 2021 च्या आयपीएल मोसमातला सर्वांत लांब षटकार ठोकला. IPL 2021 Kieron pollard hit longest Six of IPL 2021 Season

पोलार्डचा जलवा सुरु, IPL 2021 मोसमातील सगळ्यात लांब षटकार, पाहा पोलार्डच्या बॅटमधल्या 'जादू'चा Video  
पोलार्डने आयपीएल 2021 च्या मोसमातला आतापर्यंतचा सगळ्यात लांब षटकार मारलाय....
| Updated on: Apr 18, 2021 | 10:50 AM
Share

चेन्नई :  आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 14 व्या पर्वातील 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला (Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad) 13 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने टॉस जिंकून 150 धावा केल्या. हे आव्हान हैदाबादच्या फलंदाजांना पेलवलं नाही. या सामन्यात मुंबईचा वेगवान फलंदाज कायरन पोलार्डने (Kieron Pollard) 2021 च्या आयपीएल मोसमातला सर्वांत लांब षटकार ठोकला. (IPL 2021 Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Kieron pollard hit longest Six of IPL 2021 Season)

पोलार्डच्या बॅटमधून IPL 2021 मोसमातील सगळ्यात लांब षटकार

मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी केली. त्याने 22 चेंडूत 35 धावा काढल्या. ज्यावेळी मोठे शॉट्स मारणं अवघड जात होतं त्यावेळी त्याने एकेरी दुहेरी धावा घेतल्या. डावाच्या 17 व्या ओव्हरधमध्ये मुजीब रहमानच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने सगळ्यात लांब षटकार खेचला. या षटकाराची लांबी 105 मीटर होती. आयपीएल 2021 च्या मोसमातील हा सर्वांत लांब षटकार ठरला.

कायरन पोलार्डच्या 105 मीटर षटकाराअगोदर या मोसमातील लांब षटकार मरण्याचा विक्रम बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. त्याने मुंबईविरुद्धच 100 मीटरचा षटकार खेचला होता.

पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबईच्या 150 धावा

मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायचं ठरवलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि डावखुरा क्विंटन डिकॉकने (Quiton De cock) डावाची सुरुवात अतिशय धडाक्यात केली. पहिल्या बॅटिंग पॉवरप्लेवर मुंबईने राज्य केलं. 36 चेंडूत मुंबईने 53 धावा धावफलकावर लावल्या. मात्र धावगती वाढवण्याच्या नादात रोहित शर्मा आऊट झाला. नंतर हैदराबादचा हुकमी एक्का राशीद खान आणि मुजीब रहमानने मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. इशान, सुर्या आणि हार्दिकला फार चमकदार कामगिरी करता आला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये कायरन पोलार्डने 17 धावा काढल्या. त्यामुळे मुंबईला 150 चा आकडा गाठता आला.

(IPL 2021 mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Kieron pollard hit longest Six of IPL 2021 Season)

हे ही वाचा :

IPL 2021 : हार्दिक पांड्याच्या ‘रॉकेट थ्रो’ने हैदराबादच्या स्वप्नांचा चक्काचूर, इथेच फासा पलटला, पाहा व्हिडीओ…

MI vs SRH, IPL 2021 Match 9 Result | हैदराबादचा सलग तिसरा पराभव, मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय

MI v SRH IPL 2021, Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.