IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा

कोरोनाच्या (Corona Pandemic) वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा
IPL
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 7:31 PM

लंडन : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. ही लीग कधी सुरू होईल, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेलं नाही, परंतु बीसीसीआय (BCCI) सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये किंवा यूएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त आहे. परंतु याला आता इंग्लंडमधून विरोध सुरू झाला आहे. (IPL 2021 Shouldn’t Be Held In England, Monty Panesar Says English Weather Will Spoil The Fun)

इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर(Monty Panesar) म्हणाला की, बीसीसीआय सप्टेंबरमध्ये आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांचे इंग्लंडमध्ये आयोजन करण्याचा विचार करीत असेल तर त्यांनी यावर पुनर्विचार करायला हवा, कारण यामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का बसू शकतो. भारत इंग्लंडमध्ये 14 सप्टेंबर रोजी पाच कसोटी सामन्यांची मालिका संपवेल. त्या मालिकेच्या अखेरीस आणि टी – 20 विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयला महिन्याभराची विंडो मिळेल. त्यानंतर आता अशी चर्चा आहे की, या महिनाभरात बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करु शकतं.

आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करावं

माँटी पानेसर यूट्यूबवरील स्पोर्ट्स यारी या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात हा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणाला की, “सप्टेंबर महिन्यात आयपीएल इंग्लंडमध्ये आयोजित केलं जाऊ नये. कारण या काळात इंग्लंडमध्ये जोरदार पाऊस असतो. पावसामुळे अनेक सामने रद्द होऊ शकतात किंवा त्यात खूप व्यत्यय येऊ शकतो. याचा परिणाम होऊन आयपीएलचा थरार कमी होईल. जर भारतातील परिस्थिती सुधारली नाही, तर त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएलचं आयोजन करावं. कारण हवामान परिस्थिती अशा स्पर्धांवेळी खूप महत्त्वाची भूमिका निभावते.

“पावसाचा स्पर्धेवर परिणाम होऊ नये”

पानेसर म्हणाला की, जेव्हा इंग्लंडमध्ये पाऊस पडतो तेव्हा तो सामना उध्वस्त करतो. टी – 20 सामना 15 षटकांत किंवा 10 षटकांत संपवावा लागेल. आयपीएलबाबत असे घडू नये अशी आमची इच्छा आहे. जर ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये खेळवली तर या स्पर्धेच्या ब्रँड व्हॅल्यूवर त्याचा परिणाम होईल.

IPL 2021 चे उर्वरित सामने UAE मध्ये

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार 29 मे रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) सर्वसाधारण बैठकीमध्ये (SGM) याची घोषणा केली जाऊ शकते. गेल्या वर्षीही आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आलं होतं.

इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यांमध्ये 9 दिवसाचे अंतर आहे. अहवालानुसार, बीसीसीआय दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटीमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोन सामन्यांमधील अंतर 5 दिवसांनी कमी केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, बीसीसीआयने अद्याप यासाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) औपचारिक विनंती केलेली नाही.

30 दिवसात 31 सामने खेळवणार?

भारताचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल. अशा परिस्थितीत भारत-इंग्लंड मालिकेत कोणताही बदल झाला नाही तरी टी – 20 वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयकडे एक महिन्याची (15 सप्टेंबर – 15 ऑक्टोबर) विंडो असेल. या 30 दिवसांत भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना ब्रिटनहून युएईला आणण्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे. बाद फेरीसाठी 5 दिवस बाजूला ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत भारतीय बोर्डाकडे 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी असेल. या विंडोमध्ये 8 शनिवार-रविवार आहेत. याचा अर्थ असा आहे की शनिवार व रविवारी 16 सामने (डबल हेडर) खेळवले जाऊ शकतात. उर्वरित 19 दिवसांत 11 सामने खेळवता येतील.

अन्यथा 3000 कोटींचं नुकसान

आयपीएलचा 14 वा हंगाम पुन्हा सुरु न झाल्यास किंवा उर्वरित सामने खेळवता आले नाहीत तर बीसीसीआयला सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत 14 वे सत्र पूर्ण करायचे आहे. बीसीसीआयला आशा आहे की टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी परदेशी खेळाडूदेखील आयपीएलमध्ये भाग घेतील.

…म्हणून IPL इंग्लंडऐवजी यूएईमध्ये

बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यासाठी इंग्लंडऐवजी यूएईची निवड करण्यामागे तीन कारणं आहेत.

पहिलं कारण – इंग्लंडमध्ये स्पर्धा घेणे उचित नसू शकते. कारण सप्टेंबरमध्ये तिथे पावसाळा असतो. अशा परिस्थितीत सामने पार पडतील की नाही, याबाबत शंका आहे. दुसरीकडे सप्टेंबरमध्ये युएईचेहवामान अधिक चांगले असते. तिथे सप्टेंबरमध्ये पावसाचा धोका नाही.

दुसरं कारण – इंग्लंडमध्ये स्पर्धा आयोजित करणे युएईच्या तुलनेत एक महागडा व्यवहार आहे. कारण, बीसीसीआयला तेथे पाउंडमध्ये पैसे द्यावे लागतील. युएईमध्ये दिरहममध्ये कमी खर्चात स्पर्धा पार पडेल.

तिसरं कारण –  आयपीएल स्पर्धा यापूर्वी युएईमध्ये झाल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत. 13 वा हंगाम यूएईमध्ये पार पडण्याअगोदर 2014 हंगामातील काही आयपीएलचे सामनेही तिथे खेळले गेले होते.

बीसीसीआयच्या बैठकीत 29 मेला मोठी घोषणा

आयपीएलचा 13 वा मोसम यूएईमध्ये यशस्वीपणे पार पडला होता. त्यामुळे युएईमध्येच आयपीएल 2021 चा 14 हंगाम आयोजित करावा, अशी मागणी होत होती. पण बीसीसीआयने धाडसाने भारतातील 6 शहरांत स्पर्धेचं नियोजन केलं. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धी निम्म्यातच तहकूब करावी लागली. उर्वरित सामन्यांसाठी 2 वेळापत्रकांसह बीसीसीआय सज्ज आहे. येत्या 29 मे रोजी बीसीसीआयच्या एसजीएम बैठकीच्या टेबलावर ते वेळापत्रक ठेवतील.

संबंधित बातम्या

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार?

इंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण? VVS लक्ष्मणने सांगितलं नाव!

Rahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार?

(IPL 2021 Shouldn’t Be Held In England, Monty Panesar Says English Weather Will Spoil The Fun)

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.