IPL 2022, CSK vs GT : सीएसकेकडून गुजरातला 170 धावांचे टार्गेट, गुजरात लक्ष्य पूर्ण करणार?

आयपीएल 2022 मध्ये आज दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सीएसके सुरु आहे. चेन्नईनं वीस ओवरमध्ये 169 धावा काढल्या आहेत. गुजरातला 170 धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे.

IPL 2022, CSK vs GT : सीएसकेकडून गुजरातला 170 धावांचे टार्गेट, गुजरात लक्ष्य पूर्ण करणार?
ऋतुराज गायकवाडImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:25 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज दुसरा सामना गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सीएसके (CSK) सुरु आहे. चेन्नई आयपीएलमधील गतविजेता संघ आहे. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच सीजन आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने आहेत. सीएसकेची मॅच असली, की महेंद्रसिंह धोनीची नेहमीच चर्चा होते. एमएस धोनीने आता कॅप्टनशिप सोडली आहे, तरी मैदानावरील त्याचा वावर खूप महत्त्वाचा असतो. टीम अडचणीत असताना, धोनी नेहमी सल्लागाराच्या भूमिकेत दिसतो. पण, आजचं चित्र थोडं वेगळं आहे. चेन्नईनं वीस ओवरमध्ये 169 धावा काढल्या आहेत. पहिली इनिंग झाली असून अंबाती रायडूने 31 बॉलमध्ये 46 धावा काढल्या. तर दोन षटकार आणि चार चौकार मारले. त्यापूर्वी मोईन अली आऊट झाला. त्याने तीन बॉलमध्ये एक रन बनवला. तर चेन्नईची पहिली विकेट रॉबिन उथप्पाची गेली. उथप्पाने 10 बॉलमध्ये 3 धावा काढल्या. त्यानंतर चेन्नईला मोठा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड आऊट झाला. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.तर शिवम दुबेने 17 बॉलमध्ये 19 धावा काढल्या. यामध्ये 2 चौकार त्याने मारले. तर रवींद्र जडेजाने 12 बॉलमध्ये 22 धावा काढल्या. यामध्ये त्याने 2 षटकार मारले आहेत.

ऋतुराजचं अर्धशतक

चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर आज ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय.ऋतुराजने अर्धशतकही पूर्ण केलंय.

गुजरातची टीम फॉर्ममध्ये

हीच विजयी लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांची तुलना केल्यास, सध्या गुजरात टायटन्सचा संघ उजवा वाटतो. कारण त्यांनी पाच पैकी चार विजय मिळवलेत. त्यांचा खेळ पाहून तो आयपीएलमध्ये डेब्यू करणारा संघ आहे, असं वाटतच नाही.

धोनीच्या व्हिडिओची चर्चा

दरम्यान मॅचची तयारी सुरु असताना एमएस धोनीचा एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मैदानात धोनीला तुम्ही नेहमी फलंदाजी आणि स्टम्पसपाठी यष्टीरक्षण करताना पाहता. सीएसकेने पोस्ट केलेल्या व्हिडिओत धोनी चक्क गोलंदाजी करतोय. ती ही लेग स्पिन गोलंदाजी. धोनी फार कमी वेळा मैदानात असं काहीतरी वेगळ करताना दिसतो. पण त्याच्या त्या कृतीची चर्चा होते. आताही धोनीच्या या व्हिडिओची चर्चा आहे.

इतर बातम्या

Girgaon Chowpati Gallery : मुंबईकरांनो तुमची नवी दर्शक गॅलरी पाहा, गिरगाव चौपाटीच्या सौदर्यात भर

गिरगाव चौपटीवरील दर्शक गॅलरीचं उद्धाटन; मुख्यमंत्री Uddhav Thackeray व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी

CSK Cricketer Ruturaj Gaikwad : ऋतुराज गुजरात विरुद्ध जोरदार खेळला, अर्धशतकंही पूर्ण केलं, वाचा ऋतुराजविषयी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.