AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : पराभवाच्या मालिकेमुळे ऋतुराज भडकला, 4 मॅच हरण्याबद्दल कोणाला ठरवलं जबाबदार ?

Ruturaj Gaikwad : आयपीएलमधील पहिली मॅच जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सी अंतर्गत खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला लागोपाठ 4 सामन्यात हार पत्करावी लागली आहे. सततच्या पराभवानंतर काय म्हणाला ऋतुराज गायकवाड ?

IPL 2025 : पराभवाच्या मालिकेमुळे ऋतुराज भडकला, 4 मॅच हरण्याबद्दल कोणाला ठरवलं जबाबदार ?
ऋतुराज गायकवाड
| Updated on: Apr 09, 2025 | 9:48 AM
Share

PBKS vs CSK IPL 2025 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी आयपीएलमध्ये सलग चौथा सामना गमावला. पंजाबने सीएसकेचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी पंजाब किंग्जने करत 219 धावा केल्या, संघाने 83 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. पण सलामीवीर प्रियांश आर्यच्या स्फोटक शतकी खेळीमुळे संघाने मोठी धावसंख्या करत 200 पारचे लक्ष्य ठेवले. सीएसकेतर्फे एमएस धोनी पाचव्या क्रमांकावर आला, तो 12 चेंडूत 7 धावा काढून बाद झाला. त्याआधी, शिवम दुबे (42) आणि डेव्हॉन कॉनवे (69) यांनीही चांगली खेळी केली पण संघाला दिलेलं लक्ष्य पूर्ण करण्यात 19 धावा कमी पडल्या आणि चौथा पराभव पत्करावा लागला.

या मॅचनंतर ऋतुराज गायकवाडने सलगच्या पराभवांवर स्पष्ट भाष्य केलं. मॅचदरम्यान सोडलेल्या अनेक कॅचबद्दलही तो बोलला. “गेल्या चार सामन्यांमध्ये, हाच एकमेव फरक आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण झेल सोडतो तेव्हा तोच फलंदाज 20-25-30 धावा अतिरिक्त जोडतो. जर तुम्ही आरसीबीचा सामना वगळला तर, शेवटच्या तीन सामन्यातील पाठलाग , त्यात एक, दोन किंवा कदाचित तीन हिटचा प्रकार होता. कधीकधी तुम्हाला प्रियांश ज्या पद्धतीने खेळतो त्याचे कौतुक करावे लागते. त्याने त्याच्या संधींचा फायदा घेतला. ती खूप धोकादायक फलंदाजी होती आणि ती त्याच्यासाठी खरोखरच चांगली कामगिरी करत होती. आम्ही विकेट घेत होतो तरी त्याने गती कायम ठेवली. जर आम्ही चांगली कामगिरी केली असती तर 10-15 कमी धावा देऊ शकलो असतो. शेवटी पहायला गेलं तर हे सुद्धा कॅचेस सोडल्यामुळे होतं ” असं त्याने नमूद केलं.

फील्डिंगवर देतोय आणखी लक्ष, पण..

“फलंदाजीच्या दृष्टिकोनातून आजची कामगिरी उत्तम होती. आम्हाला हेच हवे होते. आमचे सर्वोत्तम फलंदाज, जे वेगवान गोलंदाजी खूप चांगली करू शकतात, ते क्रमवारीत वरच्या क्रमांकावर खेळले आणि उत्तम पॉवरप्ले दाखवला. ही एक चांगली, चांगली कामगिरी होती आणि त्यात अनेक सकारात्मक बाबी होत्या.” असं ऋतुराज गायकवाड पुढे म्हणाला. ‘ मला यातून काही सकारात्मक गोष्टी घ्यायच्या आहेत, आणि आम्ही जिंकण्यापासून दोन किंवा तीन हिट्स दूर होतो. त्याच्याकडे (कॉनवे) चेंडूला वेळेवर पकडण्याची क्षमता आहे, जी खूप उपयुक्त आहे. जेव्हा तुमच्याकडे जड्डू असतो, जो विशेषतः त्या अंतिम खेळीसाठी ओळखला जातो, तेव्हा तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करता. आपल्याला फील्डिंगचा आनंद घ्यावा लागेल, असं आम्ही खेळाडूंना सांगितलं होतं. जर तुम्ही नर्व्हस असाल, तर काही कॅच सोडाल. जर तुम्हाला उत्तम फील्डर किंवा क्षेत्ररक्षक बनायचं असेल तर पहिला कॅच (पकडणं) किंवा पहिली बाऊंड्री अडवणं, हेही खूप मदत करतं, फायदेशीर ठरतं. फील्डिंगवर आम्ही आणखी लक्ष्य देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ते आम्हाला अजून पूर्णपणे साध्य झालेलं नाही ‘ असं मतं ऋतुराजने मांडलं.

या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर आहे. त्यांनी 5 पैकी 4 सामने गमावले आहेत आणि त्यांचा नेट रन रेट (-0.889)  खूपच खराब आहे

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.