AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Final RCB vs PBKS : झोप उडाली, अंतिम सामन्याचा धसका, हा कर्णधार रात्रभर झोपलाच नाही

आईपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स आमनेसामने येत आहेत. पंजाब किंग्सचे कर्णधार श्रेयस अय्यर यांनी फायनलपूर्वी झोप न आल्याचे कबूल केले आहे. गेल्या आठवड्यातील आरसीबीविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना चिंता आहे. पण त्यांनी मुंबई इंडियन्सवर मिळवलेल्या विजयाचा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे.

IPL 2025 Final RCB vs PBKS : झोप उडाली, अंतिम सामन्याचा धसका, हा कर्णधार रात्रभर झोपलाच नाही
हा कर्णधार रात्रभर झोपलाच नाही...Image Credit source: social media
| Updated on: Jun 03, 2025 | 10:35 AM
Share

IPL 2025 Final RCB vs PBKS : पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान आज अंतिम आणि निर्णायक सामना होणार आहे. तब्बल 11 वर्षानंतर पंजाब किंग्स आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची झोप उडाली आहे. तो रात्रभर झोपूही शकला नाही. विराट कोहलीच्या आरसीबी संघाचं तगडं आव्हान श्रेयससमोर आहे. गेल्याच आठवड्यात पंजाबला आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळेच फायनलमध्ये त्याची तर पुनरावृत्ती होणार नाही ना? याची भीती अय्यरला वाटतेय. त्यामुळेच तो रात्रभर झोपू शकला नाही. अय्यरनेच तसा खुलासा केला आहे.

पंजाब किंग्सने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करून फायनलमध्ये स्थान मिळवलं. श्रेयसने अश्विनी कुमारच्या चेंडूवर षटकार लगावून पंजाबला विजयश्री मिळवून दिला. त्याला 41 चेंडूत 87 धावा केल्याबद्दल प्लेअर ऑफ द मॅच देऊन सन्मानितही करण्यात आलं. आता आज मंगळवारी पंजाब किंग्सचा थेट फायनल सामना आरसीबीसोबत आहे. दोन्ही संघ करो या मरोच्या आवेशानेच मैदानात उतरणार असल्याने या फायनलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

फक्त चार तास

श्रेयस अय्यर आणि आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने फायनलच्या एक दिवस आधी प्रेस कॉन्फरन्स केली. यावेळी दोन्ही कर्णधारांनी आयपीएल ट्रॉफीसोबत फोटोशूटही केलं. यावेळी अय्यरने मीडियाशी संवाद साधला. मी रात्री माझ्या खोलीत गेलो. पण मी झोपू शकलो नाही. मला केवळ चार तासच झोप आली. आता मी तुमच्यासमोर आहे, असं श्रेयस म्हणाला.

मला सेट होण्यासाठी वेळ मिळाला

जेव्हा मी म्हणतो की मी ‘झोन’मध्ये आहे, तेव्हा ते फक्त सामन्याच्या वेळीच नव्हे, तर खूप आधीपासून सुरू होते. तुम्ही वॉर्म-अपपासूनच स्वतःला तयार करत असता. एकदा का मी पूर्णपणे झोनमध्ये आलो की, मला माहित होतं की मी माझ्या सहकाऱ्यांना कसं प्रेरित करायचं. आमच्या गोलंदाजांनी मुंबईला २०३ धावांवर रोखलं, जे एक शानदार प्रदर्शन होतं. त्यानंतरचा प्लॅन माझ्याकडे तयार होता. मला माहित होतं की त्या लाल मातीच्या खेळपट्टीवर कसं खेळायचं. आमच्या ओपनर्सनी जबरदस्त सुरुवात करून दिली. त्यानंतर जोश इंग्लिस तिसऱ्या क्रमांकावर आला. त्यामुळे मला सेट होण्यासाठी वेळ मिळाला, असंही तो म्हणाला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.