AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs PBKS IPL Final : RCB वि.PBKS फायनलमध्ये पावसाचा खोडा आला तर कोणाला मिळणार ट्रॉफी ? काय आहेत नियम ?

IPL 2025 Final : आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे. या दिवशी अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाने सामन्यात खोडा घातला तर.. ?

RCB vs PBKS IPL Final : RCB वि.PBKS फायनलमध्ये पावसाचा खोडा आला तर कोणाला मिळणार ट्रॉफी ? काय आहेत नियम ?
पाऊस पडल्यास आयपीएलची ट्रॉफी कोणाला मिळणार ?Image Credit source: social media
| Updated on: Jun 02, 2025 | 9:08 AM
Share

RCB vs PBKS IPL 2025 Final :पंजाब किंग्स टीमने आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर- 2 फेरीत मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये धडक मारली. उद्या, अर्थात मंगळवार 3 जून रोजी पंजाब वि. आरसीबी असा अंतिम सामना रंगणार असून तो गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या फायनलमध्ये कोणीही जिंकलं तर बऱ्याच काळाने आयपीएल स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे. पंजाब किंग्ज आणि आरसीबी, या दोन्ही टीम्स आयपीएलच्या सुरूवातीपासूनच खेळत आहे. त्यांच्यापैकी एका टीमला ही ट्रॉफी मिळून विजयी इतिहास रचण्याची संधी आहे. मात्र 3 जूनला जिथे हा सामना होणार आहे, त्या अहमदाबादमध्ये उद्या पाऊसही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये पावासचा व्यत्यय आलाच तर काय होईल, फायनलसाठी रिझर्व्ह डे चे काय नियम आहेत, चला सविस्तर जाणून घेऊया…

आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबीचा संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होता.या दोन्ही टीम्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये आरसीबीने पंजाबचा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. पराभवानंतर, पंजाब दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला, जिथे काल त्यांनी मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाला 5 विकेट्सने पराभूत केले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. श्रेयस अय्यरने 87 धावांची सामना जिंकवणारी शानदार खेळी खेळली.

दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये, पावसामुळे सामना सुमारे 2 तास उशिराने सुरू झाला, त्यामुळे एक वेळ अशी आली की सामना रद्द करावा लागेल, असं वाटत होतं. कारण या सामन्यात राखीव दिवस( reserve day) नव्हता आणि जर हा सामना रद्द झाला असता तर पंजाब किंग्जला न खेळताच अंतिम फेरीचे तिकीट मिळाले असते. कारण पॉइंट्स टेबलमध्ये त्यांचा संघ अव्वल स्थानावर होता. पण याचीच ( पावसाची) पुनरावृत्ती उद्या, अर्थात अंतिम फेरीत झाली, तर ट्रॉफी कोणाला मिळेल?

3 जूनला अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता

मंगळवार, 3 जून रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलची फायनल होणार असून या सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. उद्या अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता 20 टक्के आहे. सकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि सामन्यादरम्यानही पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो.

आयपीएल फायनलमध्ये रिझर्व्ह डे आहे का ?

हो, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उद्या ( 3 जून) जर पावसामुळे सामना थांबला किंवा सुरू होऊ शकला नाही, तर सामना बुधवारी म्हणजे 4 जून रोजी खेळवला जाईल. हा रिझर्व्ह डे आहे, पण ती ( त्या दिवशी सामना खेळवला जाण्याची) दिवस आहे, शक्यता खूपच कमी असेल.

आयपीएल 2025 फायनल मॅच शेड्यूल

आईपीएल फाइनल मैच का शेड्यूल

टीम : आरसीबी वि. पंजाब

तारीख: 3 जून, 2025

वेळ: संध्याकाळी 7.30 वाजता

टॉस: संध्याकाळी 7 वाजता

स्थळ ( व्हेन्यू) : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.