IPL 2026 Points Table : राजस्थानचा विजयी षटकार, श्रेयससेनेला रोखलं, पंजाब पराभवानंतर कितव्या स्थानी?
IPL 2026 Points Table, IPL 2026 Points Table 40TH Match : अखेर राजस्थान रॉयल्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात पंजाब किंग्सला पराभूत करणारी पहिली टीम ठरली आहे. राजस्थानला पंजाब विरुद्धच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेतील पहिल्या 7 सामन्यात दबदबा कायम ठेवला होता. पंजाबने 7 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला होता. तर पंजाबचा 1 सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे राजस्थान रॉयल्स यजमान पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानात आणि मोहिमेतील आपल्या आठव्या सामन्यात पराभूत करणार का? याकडे लक्ष लागून होतं. राजस्थानने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं. राजस्थानने होम टीम पंजाबला न्यू चंडीगडमधील मुल्लानपूर येथील स्टेडियममध्ये सलग आणि एकूण तिसऱ्यांदा पराभूत केलं. राजस्थानने या विजयासह विजयी षटकार लगावला. तर पंजाबचा हा 19 व्या पर्वातील पहिला पराभव ठरला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये अदलाबदल झाली आहे. या निमित्ताने कोणता संघ कोणत्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.
