AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

आयपीएलचे उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने हा निर्णय घेऊन तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं आहे. (IPL has been moved to UAE for IPL 2021 Season BCCI Vice president Rajeev Shukla)

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci President Sourav Ganguly)
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 29, 2021 | 2:17 PM
Share

मुंबई : जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 व्या पर्वाबाबत (IPL 2021) स्पर्धेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने हा निर्णय घेऊन तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं आहे. आता अतिशय कमी वेळेत उर्वरित सामन्यांचं आयोजन बीसीसीआयला करावं लागणार आहे. कमी वेळेत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणं बीसीसीआय समोरचं मोठं आव्हान असणार आहे. (IPL has been moved to UAE for IPL 2021 Season BCCI Vice president Rajeev Shukla)

आयपीएलच्या 14 व्या पर्वातले 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा मात्र आयपीएलचे (IPL 2021) सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती.

BCCI ची महत्त्वाची बैठक मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting)  आयोजन केलं होतं. बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

अन्यथा BCCI ला 3000 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं असतं…!

आयपीएलचा 14 वा हंगाम पुन्हा सुरु झाला नसता तर बीसीसीआयला सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागेल. कारण अनेक कंपन्याची स्पॉन्सरशीप आयपीएलल स्पर्धेला होती. त्यामुळे बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत 14 वं सत्र पूर्ण करायचं होतं. त्यामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेत मोठा आर्थिक तोटा टाळण्यासाठी उर्वरित सामन्यांचं आयोजन यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

30 दिवसात 31 सामने खेळवणार?

भारताचा इंग्लंड दौरा 18 जूनला सुरु होऊन 14 सप्टेंबरला संपेल. भारत-इंग्लंड मालिकेत कोणताही बदल झाला नाही तरी टी – 20 वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयकडे एक महिन्याची (15 सप्टेंबर – 15 ऑक्टोबर) विंडो असेल. या 30 दिवसांत भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना ब्रिटनहून युएईला आणण्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे. बाद फेरीसाठी 5 दिवस बाजूला ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी असेल. या विंडोमध्ये 8 शनिवार-रविवार आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक शनिवार व रविवारी दोन सामने खेळवले तर महिन्यात 16 डबल हेडर सामने खेळवले जाऊ शकतात. उर्वरित 19 दिवसांत 11 सामने खेळवता येतील.

यूएईमध्येच आयपीएलचं आयोजन का

पहिलं कारण –  सप्टेंबरमध्ये युएईचेहवामान अधिक चांगले असते. तिथे सप्टेंबरमध्ये पावसाचा धोका नाही.

दुसरं कारण – युएईमध्ये इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात स्पर्धा पार पडणार आहे.

तिसरं कारण –  आयपीएल स्पर्धा यापूर्वी युएईमध्ये झाल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत. 13 वा हंगाम यूएईमध्ये पार पडण्याअगोदर 2014 हंगामातील काही आयपीएलचे सामनेही तिथे खेळले गेले होते.

(IPL has been moved to UAE for IPL 2021 Season BCCI Vice president Rajeev Shukla)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

BCCI SGM : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही? BCCI ची विशेष बैठक, IPL बाबतही मोठा निर्णय अपेक्षित

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या