‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना आयर्न मॅन हा किताब मिळाला आहे. त्यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

'वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना 'आयर्न मॅन किताब'
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 10:37 PM

मुंबई : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना आयर्न मॅन हा किताब मिळाला आहे. त्यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. अशी नोंद होणारे ते पहिले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. हा मान भारतीय सैन्य किंवा निमलष्करी दलातील अधिकाऱ्यांना देखील अद्याप मिळालेला नाही. हा विक्रम आपल्या नावावर होण्यासाठी पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतलीय. त्यामुळे त्यांचं देशभरातून कौतुक होत आहे. त्यांनी आज (20 जानेवारी) सोशल मीडियावर याची माहिती दिली (IPS officer Krishna Prakash in World Book of Records to earn the Iron Man title).

कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पोस्टमध्ये हा सन्मान देशाला, भारतीय पोलीस दलातील सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देण्या सर्वांना अर्पण केलाय. त्यांनी 2017 मध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन हा जगातील सर्वात आव्हानात्मक एक दिवसीय खेळ प्रकार पूर्ण केला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकाला 3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमीटरची सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावावं लागतं. हे सर्व केवळ 16 ते 17 तासांच्या कालावधीत पूर्ण करायचं असतं.

कृष्ण प्रकाश आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी अहमदनगरमध्ये गुन्हेगार टोळ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ते महाराष्ट्रभरात चर्चेत होते. सध्या ते पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत. नियमप्रिय आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून कृष्ण प्रकाश यांचा लौकिक आहे. ते त्यांच्या फिटनेससाठी देखील ओळखले जातात. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. मात्र, हा विक्रम त्यांच्यासह पोलीस विभागाचाही सन्मान वाढवणारा ठरलाय.

कृष्ण प्रकाश यांनी आज (20 जानेवारी) सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती दिली. यासोबत त्यांनी त्यांचे काही फोटोही शेअर केले. यात त्यांना या विक्रमासाठी एक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केल्याचंही दिसत आहे.

हेही वाचा :

 मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचे झुंजार शतक, विक्रमाला गवसणी

 अश्विनचं रवी शास्त्रींच्या पावलावर पाऊल, तब्बल 35 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये धमाका

संदीप शर्माची चमकदार कामगिरी, झहीर खानचा रेकॉर्ड मोडित

व्हिडीओ पाहा :

IPS officer Krishna Prakash in World Book of Records to earn the Iron Man title

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.