कोण आहेत अदर पुनावाला ? विराट कोहलीची आरसीबी आयपीएल टीम विकत घेणार? नेटवर्थ किती ?
आयपीएलची सुरुवात साल 2008 मध्ये झाली होती. तेव्हा आरसीबी टीम दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी टीम होती. तसेच साल 2016 मध्ये विजय माल्या यांचा बिझनस ग्रुप दिवाळखोर झाल्यानंतर यूनायटेड स्पिरिट्सने टीमची मालकी स्वीकारली होती.

आयपीएल आणि कॉर्पोरेट जगतात यावेळी एक मोठी डील चर्चेत आहे. देशाचे सर्वात मोठे व्हॅक्सीन निर्माता सीरम इन्सिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला खरेदी करणार आहेत. त्यामुळे क्रिकेट जगतासह उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. विराट कोहलीच्या या फ्रेचायझी संदर्भात चर्चा सुरु असताना आता उद्योजक अदर पुनावाला नेमके किती श्रीमंत आहेत यावरही चर्चा सुरु आहे. आरसीबी सारखी महागडी टीम खरेदी करण्याचा सौदा अदर पुनावाला करणार आहेत. व्हॅक्सीन किंग अदर पुनावाला नेमके किती पैसेवाले आहेत हे पाहूयात..
आरसीबी खरेदी करण्याची इच्छा आणि अदर पुनावाला
अदर पुनावाला कोरोना काळात चर्चेत आले होते. त्यांच्या लसीमुळे कोरोनाकाळात अनेकांचे प्राण वाचले. अनेक देशात ही व्हॅक्सीन निर्यात देखील झाली होती. अदर पुनावाला यांनी काही महिन्यांपूर्वी आयपीएलची सर्वात तगडी टीमपैकी एक असलेल्या आरसीबीला विकत घेण्यासाठी मोठी बोली लावणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे ज्यावेळी आरसीबीची सध्याचे मालक कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड फ्रेंचायझीमध्ये तिच्या गुंतवणूकीस संदर्भात फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. युनायटेड स्पिरिट्स ग्लोबल ड्रींक कंपनी डियाजिओची भारतीय ब्रँच आहे. त्यामुळे टीमला विक्रीसाठी सादर केले जाऊ शकतात असे संकेत मिळत आहेत.
आरसीबीची ब्रँड व्हॅल्यू किती ?
आरसीबीने आयपीएल 2025 मध्ये तिचा पहिला विजय जिंकून इतिहास रचला होता. ज्यामुळे टीमची ब्रँड व्हॅल्यूत मोठी वाढ झाली आहे. याआधी आरसीबी 2009, 2011 आणि 2016 मध्ये फायनलमध्ये पोहचली होती, परंतू फायनलमध्ये अपयश आले होते. तसेच आरसीबीच्या महिला टीमने 2024 मध्ये महिला प्रीमियर लीग जिंकली होती. लीग मधील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टीममध्ये सामील आरसीबीच्या चाहत्यांची संख्या देखील सर्वात जास्त मानली जात आहे.
अदर पूनावाला यांची नेटवर्थ
अदर पुनावाला हे व्हॅक्सीन निर्माता सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. तसेच वडील आणि सीरम इन्स्टीट्युटचे संस्थापक सायरस पुनावालाची यांची रिअल टाईम नेटवर्थ सुमारे 18.8 अब्ज डॉलर म्हटली जात आहे. अदर पुनावाला कौटुंबिक व्यवसायासह इतर अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याने ते अब्जावधी डॉलर संपत्तीचे मालक म्हटले जात आहे. अदर पुनावाला यांच्या संपत्तीत पुनावाला फिनकॉर्पमध्ये भागीदारी, पुणे येथील लक्झरी Ritz Carlton हॉटेलमध्ये गुंतवणूक आणि लंडनच्या उच्चभ्रू परिसरातील मेफेअर परिसरातील आलिशान बंगल्याचा समावेश आहे.
कोविड-19 दरम्यान सीरम इन्स्टीट्यटने कोव्हीशील्ड व्हॅक्सीनची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली होती. ही देशातील सर्वात जास्त वापरली जाणारी कोव्हीड व्हॅक्सीन ठरली आहे.त्याच दरम्यान कंपनीने पुण्यातील नवीन फॅक्ट्रीसाठी सुमारे 800 मिलियन डॉलर गुंतवणूक केली होती. याशिवाय अदर पुनावालाला फोर्ब्स आशियाच्या Philanthropy Heroes च्या यादी समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना साल 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानिक केले गेले.
