AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate :बँक लॉकरमध्ये तरी सोने सुरक्षित आहे का ? चोरी झाल्यास पूर्ण पैसे मिळतात? RBI चा धक्कादायक नियम

सोन्या-चांदीच्या वाढत्या दराच्या काळात बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बँक लॉकरमध्ये सोने ठेवले की चिंता मिटली असे अनेकांना वाटते. परंतु आरबीआयचे नियम मात्र वेगळेच सांगतात.

Gold-Silver Rate :बँक लॉकरमध्ये तरी सोने सुरक्षित आहे का ? चोरी झाल्यास पूर्ण पैसे मिळतात? RBI चा धक्कादायक नियम
Gold-Silver Bank Locker Rules
| Updated on: Jan 23, 2026 | 10:36 PM
Share

Gold-Silver Bank Locker Rules: सोन्याचे आणि चांदीचे दर प्रचंड वाढले आहेत. या दरवाढीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने खरंच संपूर्ण सुरक्षित आहे का ? सर्वसाधारण धारणा अशी आहे की बँक लॉकर सर्वात सुरक्षित पर्याय आहे. परंतू सत्य परस्थिती अशी आहे की जर बँक लॉकरमधून सोने आणि चांदीची चोरी झाली, किंवा आग लागली वा कोणा कर्मचाऱ्याच्या हलगर्जीने नुकसान झाले, तर ग्राहकाला संपूर्ण नुकसान भरपाई मिळते का ? या संदर्भात आरबीआयचे काय म्हणणे आहे पाहूयात..

लॉकरमधील सोन्यासंदर्भात बँकेची जबाबदारी किती ?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची संपूर्ण जबाबदारी बँकेची असत नाही. जर आग, चोरी, दरोडा आणि इमारती कोसळणे वा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीने काही सामान गायब झाले तर बँकेची जबाबदारी लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या केवळ १०० पट मर्यादित असते. उदाहरणार्थ जर तुम्ही बँकेच्या लॉकरचे वार्षिक भाडे २००० रुपये देत आहात, तर बँक कमाल जबाबदारी म्हणून अशा वेळी जास्तीत जास्त २ लाख रुपये भरपाई देऊ शकते.

सोन्याची वाढती किंमत आणि जोखीम वाढली..

अलिकडच्या महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमत वाढ झाली आहे. अशात अनेकांनी वर्षांपूर्वी खरेदी केलेले सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले आहे. त्यांच्यासाठी ही जोखीम वाढली आहे. लॉकरचे भाडे तेवढेच असले तरी सोन्याची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. अशा स्थितीत नुकसान झाल्यास बँकच्या कडून मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी ठरु शकते.

बँक लॉकरमधील सोन्याचा विमा उतरवता येतो का ?

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या सोने वा मौल्यवान वस्तूंचा कोणताही विमा काढत नाही.आरबीआयच्या नियमानुसार बँकेला लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची माहिती नसते. यामुळे ते याचा विमा उतरवत नाहीत. एवढेच काय बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या लॉकरमधील साहित्याच्या साठी विमा प्रोडक्ट ऑफर करण्याची परवानगी देखील नसते.

ग्राहकांच्या हातात काय ?

तज्ज्ञांच्या मते ग्राहकांना स्वत: त्यांच्या दागिन्यांचा विमा करायला हवा. जनरल इंश्योरेंस कंपन्या ज्वेलरीचा विमा उतरवून देतात. चोरी, आग, दरोडा आणि नैसर्गिक संकटात विम्याचे कवच मिळते. अनेक होम इंश्योरेंस पॉलिसी व्हॅल्युएबल्स एण्ड ज्वेलरी ऐड ऑनद्वारे बँकेत ठेवलेल्या सोन्याला देखील विमा कवच पुरवतात.

नैसर्गिक संकटात काय ?

जर पुर, भूकंप,वीज कोसळणे वा अन्य नैसर्गिक संकटात नुकसान झाले तर बँकेची कोणतीही जबाबदारी रहात नाही. अशा प्रकरणात संपूर्ण जोखीम ग्राहकांची असते. मात्र, बँकांना त्यांची लॉकर सिस्टीम आणि इमारती सुरक्षा करण्याची तजवीत करावी लागते. परंतू नुकसान भरपाई ग्राहकांना अशा प्रकरणात मिळत नाही.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.