‘नीले गगन के तले’, संजना गणेशनच्या थ्रो बॅक फोटोने फॅन्सना भुरळ

संजना गणेशन हिने 31 मे रोजी आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. हा थ्रो बॅक फोटो असल्याचं तिने सांगितलंय. या फोटोत ती निळ्या आकाशाखाली आणि निळ्याशार समुद्राच्या बीचवर असलेली पाहायला मिळतीय. (Jasprit Bumrah Wife Sanjana Ganeshan throwback Photo)

'नीले गगन के तले', संजना गणेशनच्या थ्रो बॅक फोटोने फॅन्सना भुरळ
संजना गणेशन

मुंबईसंजना गणेशन (Sanjana Ganeshan)…. भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) बायको… तर लाखो क्रिकेट रसिकांची आवडती क्रिकेट समालोचक…. तिला पाहण्यासाठी बुमराह वेडा होता, तर तिचा आवाज ऐकण्यासाठी क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे कान नेहमीच आतुर असतात. तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफबद्दल नेहमीच चर्चा होत असते. आता तिने सोशल मीडियावर केलेल्या एका फोटोमुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. (Jasprit Bumrah Wife Sanjana Ganeshan throwback Photo)

‘नीले गगन के तले…’

संजना गणेशन हिने 31 मे रोजी आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. हा थ्रो बॅक फोटो असल्याचं तिने सांगितलंय. या फोटोत ती निळ्या आकाशाखाली आणि निळ्याशार समुद्राच्या बीचवर असलेली पाहायला मिळतीय. कदाचित संजनाचा हा फोटो मालदीवमधला असावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)

संजनाच्या लूकची चाहत्यांना भुरळ

संजना नेहमीच स्टाईलिश लूकमध्ये असते. या फोटोतही संजना अतिशय सुंदर दिसत आहे. फोटोत संजनाने व्हाईट प्रिटेंड स्ट्रॅपी फ्लोई ड्रेस कॅरी केलाय. तर हातात तिने बांगड्या घातल्यात. नो मेकअपमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. लाखभर लोकांनी तिचा फोटो लाईक्स करुन फोटो आवडल्याचं सांगितलंय. तर शेकडो लोकांनी कमेंट करुन तिच्या सौंदर्याचं भरभरुन तारीफ केलीय.

संजनाचा नवरा जसप्रीत बुमराहला देखील हा फोटो चांगलाच आवडलाय. त्याने संजनाचा हा फोटो लाईक केलाय. कोणतेही कमेंट करता पोस्टवर हर्ट देउन आपलं प्रेम त्याने व्यक्त केलंय.

बुमराहला खूश करण्यासाठी संजनाची अनोखी शक्कल!

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर् बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्याचं समालोचन करण्यासाठी पेशाने समालोचक असलेली जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन जेव्हा आली तेव्हा तिने अंगावर वन शोल्डर निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. साहजिक नेटकऱ्यांना हे कनेक्शन कळालं आणि त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कुणी म्हणालं प्रेम असावं तर असं… तर कुणी म्हणालं, नवरा बायकोचं प्रेमचं वेगळं असतं…!

बुमराह आणि संजना मार्च महिन्यात विवाहबद्ध

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह मार्च महिन्यात विवाहबद्ध झाला. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan)  तो लग्नबेडीत अडकला. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

(Jasprit Bumrah Wife Sanjana Ganeshan throwback Photo)

हे ही वाचा :

भल्याभल्यांना जमली नाही ती कामगिरी जेम्स अँडरसन करणार, सचिन तेंडुलकरचा ‘तो’ रेकॉर्ड तोडणार?

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

ऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतताच गर्लफ्रेंडकडून गोड बातमी, म्हणते ‘कुणी तरी येणार येणार गं…!’