जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर ‘जय विरुद्ध दादा’ आमनेसामने!

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडिअम असलेल्या सरदार पटेल मोटेरा स्टेडिअमवर (Sardar Patel Motera Stadium) एका मैत्रीपूर्ण लढतीचं आयोजन केलं गेलं आहे.

जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर 'जय विरुद्ध दादा' आमनेसामने!
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 2:35 PM

अहमदाबाद : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा अहमदाबादमध्ये 24 डिसेंबर रोजी होणार आहे. याअगोदर जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडिअम असलेल्या सरदार पटेल मोटेरा स्टेडिअमवर (Sardar Patel Motera Stadium) एका मैत्रीपूर्ण लढतीचं आयोजन केलं गेलं आहे. बीसीसीआयचे इलेक्टोरल बोर्डाचे सदस्य या मॅचमध्ये सहभागी होणार आहे. (Jay Shah Vs Saurav ganguly Friendly Match At Motera Stadium)

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav ganguly) विरुद्ध सचिव जय शाह (Jay Shah) यांच्या टीमदरम्यान 25 डिसेंबर रोजी मैत्रीपूर्ण लढत खेळली जाईल. जगातील सगळ्यात मोठ्या मोटेरा क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. नव्या स्टेडिअमच्या पीचसहित ग्राऊंडचा अंदाज यावा, यासाठी हा सामना टेनिस बॉलवर खेळला जाणार आहे.

24 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध डे-नाईट टेस्ट मॅच मोटेरा स्टेडियमवर होईल. चार सामन्यांच्या मालिकेतील ही तिसरी कसोटी असेल. याशिवाय इंग्लंडविरुद्धची मालिकेतील चौथी कसोटी (4-8 मार्च) याच स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे.

एक लाख दहा हजार प्रेक्षकांची क्षमता असणारे मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. भारत विरुद्ध इंग्लंड डे-नाईट कसोटीनंतर 5 सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका अहमदाबादमध्येही खेळली जाईल. याच स्टेडियममध्ये फेब्रुवारीमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी अहमदाबाद येथे होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलच्या दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश करण्याचा प्रमुख मुद्दा असेल. देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात करण्यावरही चर्चा होणे अपेक्षित आहे. या सभेत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये 10 संघांच्या सहभागास मान्यता दिली जाऊ शकते.

गौतम अदानी आणि संजीव गोएंका (माजी फ्रेंचायझी राइझिंग पुणे सुपरगिजंट्सचे मालक) हे देखील संघ खरेदी करण्यास इच्छुक असलेली सर्वात मोठी नावे आहेत. एजीएममध्ये बीसीसीआयच्या निर्वाचन मंडळाचे 28 सदस्य उपस्थित राहतील.

(Jay Shah Vs Saurav ganguly Friendly Match At Motera Stadium)

संबंधित बातम्या

हटके अंदाज, विचित्र बोलिंग डेंजर रनअप, आकाश चोप्राकडून व्हिडीओ शेअर

Aus vs Ind | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर-सीन एबॉट बॉक्सिंग डे कसोटीतून बाहेर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.