AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुलदीप यादवला गेस्ट हाऊसवर कोरोना लस, चौफेर टीकेनंतर प्रशासनाचे चौकशीचे आदेश

एका अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "कुलदीप गोविंदनगरमधल्या जागेश्वर रुग्णालयात लसीकरणासाठी जाणार होता. परंतु त्याला कानपीरमधल्या गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर लस दिली गेली." (Kanpur Administration order inquiry Cricketer kuldeep yadav take Corona Vaccine At Guest House)

कुलदीप यादवला गेस्ट हाऊसवर कोरोना लस, चौफेर टीकेनंतर प्रशासनाचे चौकशीचे आदेश
गेस्ट हाऊसच्या हिरव्यागार लॉनवर कुलदीप यादवने लस घेतली. ज्यामुळे तो अडचणीत सापडलाय.
| Updated on: May 19, 2021 | 11:41 AM
Share

मुंबई : कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देशभरात लसीकरण सुरु आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी करुनही लसीच्या कमतरतेमुळे लोकांना लस मिळत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना भारतीय संघातल्या एका क्रिकेटपटूला लसीकरणासंबंधी असलेल्या सरकारी नियमांतून सूट मिळाली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर लस टोचून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला मिलालेली VVIP ट्रिटमेंट उजेडात आल्यानंतर कानपूर जिल्हा प्रशासनाने त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कुलदीप यादव आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. (Kanpur Administration order inquiry Cricketer kuldeep yadav take Corona Vaccine At Guest House)

कुलदीपला VVIP ट्रिटमेंट?

कुलदीप यादवने 15 मे 2021 रोजी दुपारी 3 वाजून एक ट्विट केलं. या ट्विटमधून त्याने लस घेतल्याची माहिती दिली. सोबत लस घेतानाचा एक फोटो त्याने शेअर केला. या फोटोतून स्पष्ट दिसत होतं की त्याने लस घेतलेली जागा ही लसीकरण केंद्र नव्हतं वा रुग्णालय देखील नव्हतं. एका हिरव्यागार लॉनवर त्याने लस घेतली होती. कुलदीपला VVIP ट्रिटमेंट मिळाली की काय? अशी शंका अनेकांनी उपस्थित केली.

कानपूर जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश

कुलदीप यादवने कोरोना लसीकरण नियमांचं उल्लंघन केलंय का? हे तपासण्याचे आदेश अनेकांच्या तक्रारीनंतर कानपूर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कानपूरचे जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना यासंबंधीचे आदेश देताना चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एका अधिकाऱ्याची गुप्त माहिती

एका अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, “कुलदीप गोविंदनगरमधल्या जागेश्वर रुग्णालयात लसीकरणासाठी जाणार होता. परंतु त्याला कानपीरमधल्या गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर लस दिली गेली.”

कुलदीपला गेस्ट हाऊसच्या लॉनवर लस, नेटकऱ्यांचा संताप

कुलदीपने ट्विट केलेल्या फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत होतं की त्याने रुग्णालयात किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली नाही. त्यानंतर लोकांनी ट्विटरवरती त्याला प्रश्न देखील विचारले. विविध राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना खुद्द देशाचे पंतप्रधान लस घेण्यासाठी रुग्णालयात जातात, मग कुलदीपला लस देताना नियमांची पायमल्ली का? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला.

(Kanpur Administration order inquiry Cricketer kuldeep yadav take Corona Vaccine At Guest House)

हे ही वाचा :

IAS ची परीक्षा पास झालेला भारतीय संघातील खेळाडू कोण?

9 वर्षांत 4 डाव खेळला, चारही डावांत धडाकेबाज शतकं, ‘तोच’ संयमी पण तितकाच आक्रमक बॅट्समन कोण?

WTC फायनलमध्ये ‘मालिकावीर’ पुरस्कार कोण पटकवणार?, 3 खेळाडू शर्यतीत, एका भारतीय खेळाडूची दावेदारी!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.