सानियाची बहीण दुसऱ्यांदा करणार निकाह, अझरुद्दीनच्या मुलाशी लगीनगाठ

सानिया मिर्झाने अझरुद्दीनचा मुलगा असदबरोबर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत 'फॅमिली' असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर असद आणि सानियाची बहीण अनम यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला.

सानियाची बहीण दुसऱ्यांदा करणार निकाह, अझरुद्दीनच्या मुलाशी लगीनगाठ
अनिश बेंद्रे

|

Oct 07, 2019 | 11:07 AM

मुंबई : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन आणि टेनिसस्टार सानिया मिर्झा एकमेकांचे व्याही होणार आहेत. अझरुद्दीनचा मुलगा असद आणि सानियाची बहीण अनम मिर्झा (Mohammad Asaduddin to Marry Anam Mirza) लवकरच निकाह करणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात हा विवाह सोहळा होणार आहे.

असद आणि अनम एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा आधीपासूनच रंगत होत्या. त्यानंतर नुकतंच सानियाने या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे. ‘डिसेंबरमध्ये अनम आणि असद लगीनगाठ बांधणार आहेत. आम्ही नुकतंच पॅरिसला तिची बॅचलरेट ट्रीप करुन आलो. आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत’ असं सानिया म्हणते.

सानिया मिर्झाने असदबरोबर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘फॅमिली’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर असद आणि अनम यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना (Mohammad Asaduddin to Marry Anam Mirza) सोशल मीडियावर ऊत आला.

अनम मिर्झा ही व्यवसायाने फॅशन स्टायलिस्ट आहे. सानिया बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये बहिणीने स्टाईलाइज्ड केलेले कपडे परिधान करताना दिसते. अनमचं हे दुसरं लग्न आहे. 2015 मध्ये तिने अकबर रशीदशी निकाह केला होता.

29 वर्षीय असद उर्फ मोहम्मद असदुद्दीन हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मोठा मुलगा. असद हा उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. सप्टेंबर 2018 मध्ये त्याची निवड गोवा क्रिकेट संघात झाली होती. गेल्या वर्षी त्याने रणजीत पदार्पण केलं.

अझरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा

अझरुद्दीन यांचं लग्न 1987 मध्ये नौरीन यांच्याशी झालं. त्यांना असदुद्दीन आणि अयाझुद्दीन ही दोन मुलं. 1996 मध्ये अझरुद्दीन यांनी नौरीनशी घटस्फोट घेतला.

अजिंक्य रहाणेच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत अझरुद्दीन यांनी 1996 मध्ये विवाहगाठ बांधली. परंतु 2010 मध्ये दोघांचं नातं संपुष्टात आलं. टेनिसपटू ज्वाला गुट्टासोबत अझरुद्दीनच्या अफेअरच्या चर्चांमुळे संगीता बिजलानीसोबत तो विभक्त झाल्याचं म्हटलं जातं. अझरुद्दीन मात्र आपण संगीतासोबत विवाहबंधनात असल्याचा दावा करतो.

अझरुद्दीनचा धाकटा मुलगा अयाझुद्दीनचा 2011 मध्ये बाईक अपघातात मृत्यू झाला होता. वडिलांनी ईद गिफ्ट म्हणून दिलेली बाईक चालवताना त्याचा दुर्दैवी अंत झाला होता.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें