मास्क घातला नाही म्हणून मिताली राजने मिश्किल अंदाज केलं वडिलांना ट्रोल, ट्विट व्हायरल

मास्क घातला नाही म्हणून मिताली राजने मिश्किल अंदाज केलं वडिलांना ट्रोल, ट्विट व्हायरल
मिताली राज

मिताली राजने सोशल मीडियावर आपल्या वडिलांचे काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते ऑटो ड्रायव्हरला आवश्यक वस्तू, थोडं राशन आणि पैसे देताना दिसत आहेत. (Mithali Raj Trolled his father for not wearing mask)

Akshay Adhav

|

May 28, 2021 | 8:15 AM

मुंबई :  कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढतो आहे. लाखो लोकांना कोरोनाची बाधा होतीय तर हजारो जणांना कोरोनाने आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण दररोज कोरोनाने बाधित होत आहेत. अशातच कोरोनाशी लढणाऱ्या नागरिकांसाठी मदतीचे हात पुढे येतायत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचं (Mithali Raj) नाव जोडलं गेलं आहे. कोरोना काळात अडचणीत सापजलेल्या ऑटो ड्रायव्हरच्या मदतीसाठी मिताली राजने पाऊल उचललं आहे. या सगळ्यामध्ये एक मजेदार प्रसंग घडलाय. या प्रसंगात वडिलांच्या चुकीबद्दल तिने मिश्किल शैलीत भाष्य करत वडिलांची चूक दाखवून दिलीय. (Mithali Raj Trolled his father for not wearing mask)

कोरोनाच्या कठीण काळात मितालीचा मदतीचा हात

मिताली राजने सोशल मीडियावर आपल्या वडिलांचे काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते ऑटो ड्रायव्हरला आवश्यक वस्तू, थोडं राशन आणि पैसे देताना दिसत आहेत. पण ही मदत करताना मितालीच्या वडिलांचा मास्क मात्र तोंडाखाली आल्याचं दिसत आहे. मितालीने हीच बाब हेरली आणि फोटो शेअर करताना वडिलांच्या त्या चुकीवर मिश्किल पद्धतीने भाष्य केलं.

असं केलं मितालीने वडिलांना ट्रोल

मिताली राजने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “कोरोना व्हायरसच्या कठीण काळात माझे वडील माझ्या अनुपस्थितीत वाहन चालकांना पैसे आणि राशन देत आहेत. मी गेल्या वर्षी हा उपक्रम सुरु केला. परंतु आता माझ्या अनुपस्थितीत माझे वडील ही जबाबदारी घेत आहेत. येथे फक्त त्यांच्या मास्कचा प्रोब्लेम झालाय…!”

मितालीचा मिश्किल अंदाज चाहत्यांच्या पसंतीला

मितालीच्या चाहत्यांना देखील मितालीचा हा मिश्किल अंदाज आवडला आहे. त्यांनीही मितालीची तारीफ करत तिलाही कोरोना काळात काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच मितालीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

(Mithali Raj Trolled his father for not wearing mask)

हे ही वाचा :

‘मी वाट पाहतोय’, फोटो शेअर करत रोहित शर्माचा खास मेसेज!

इंग्लिश बॅट्समन माझा ‘हा’ खास प्लॅन समजूच शकत नव्हते, अक्षर पटेलचा खुलासा

‘नाद करा पण माझा कुठं…’ म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें