Mohammed Siraj : मोहम्मद सिराजने जी दारु धुडकावली, त्याची किंमत किती? भारतात तर नाहीच मिळत
Mohammed Siraj : टीम इंडियाने काल इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना जिंकला. इंग्लंडच्या क्रिकेट परंपरेनुसार मोहम्मद सिराजला एक दारुची बाटली ऑफर करण्यात आलेली. पण त्याने ती धुडकावली. तुम्हाला माहितीय का, त्या दारुच्या बाटलीची किंमत किती आहे?

4 ऑगस्टला सगळ्यांच्या नजरा ओव्हल मैदानाकडे लागलेल्या. याचं कारण होतं, बऱ्याच काळानंतर एक कसोटी सामना रंगतदार वळणावर होता. ह्दयाचे ठोके वाढलेले. परिस्थिती क्षणा-क्षणाला बदलत होती. पण अखेरीस विजय टीम इंडियाचा झाला. भारतीय टीमने ओव्हल टेस्ट 6 धावांनी जिंकली. धावांच्या हिशोबाने टेस्ट क्रिकेटमधील हा छोटा विजय आहे. या विजयानंतर ओव्हल टेस्टमध्ये 9 विकेट काढणाऱ्या मोहम्मद सिराजला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. इंग्लंडच्या क्रिकेटची परंपरा आहे की, प्लेयर ऑफ द मॅच बनणाऱ्या खेळाडूला मेडल सोबत अवॉर्ड म्हणून शॅम्पेनची बॉटल दिली जाते. पण मोहम्मद सिराजने दारुची बाटली घेतली नाही.
सर्वप्रथम हे समजून घ्या की, मोहम्मद सिराजने शॅम्पेनची बॉटल घ्यायला नकार का दिला?. याचं कारण आहे, धार्मिक मान्यता. इस्लाम धर्मात दारु अपवित्र मानली जाते. त्यामुळे सिराजने ती दारुची बाटली घेतली नाही. आता प्रश्न आहे की, सिराजने जी शॅम्पेन नाकारली, त्याचं वैशिष्ट्य काय आहे?. त्याची किंमत किती आहे? ती बनते कशी? टेस्ट कशी असते?
त्या शॅम्पेन बॉटलची किंमत किती?
सिराजला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर चॅपल डाऊन शॅम्पेन बॉटल दिली जात होती. हा यूकेचा ब्रांड आहे. सिराजने भले आपल्या धार्मिक मान्यतांमुळे ती बॉटल घेतली नसेल, पण भारतीय बाजारात त्या एका बॉटलची किंमत 15,425 रुपये आहे. भारतीय बाजारात शॅम्पेन मिळत नाही.
शॅम्पेन परफेक्ट मानली जाते
चॅपल डाऊन शॅम्पेन कुठल्या गोष्टीपासून बनते?. मिळालेल्या माहितीनुसार ही शॅम्पेन द्राक्षापासून बनवली जाते. चॅपल डाऊन वाइनमध्ये आंबट, सफरचंद आणि आशियाई मसाल्यांची टेस्ट आहे. कुठला खास प्रसंगासाठी शॅम्पेन परफेक्ट मानली जाते.
प्रत्येक मुस्लिम खेळाडू असच करतो
ओव्हल टेस्ट मॅचनंतर शुबमन गिल प्लेयर ऑफ द सीरीज ठरला, त्याला सुद्धा हीच दारुची बाटली मिळाली. त्याने स्वीकारली पण सिराजने धुडकावली. जगातला प्रत्येक मुस्लिम खेळाडू असच करतो. मग, कुठलाही खेळ असो. मुस्लिम खेळाडू नेहमीच शॅम्पेन सेलिब्रेशनपासून लांब रहातात.
