IPL2020: हिटमॅन रोहित शर्मा पाचहजारी मनसबदार, आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)आयपीएल (IPL2020)मधील 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.(Rohit Sharma complete 5000 ipl runs)

IPL2020: हिटमॅन रोहित शर्मा पाचहजारी मनसबदार, आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी

अबुधाबी: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)आयपीएल (IPL2020)मधील 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रोहित शर्माला 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 2 धावा आवश्यक होत्या. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार ठोकत 5 हजार धावांचा टप्पा रोहितने पूर्ण केला. (Rohit Sharma complete 5000 IPL runs )

पाच हजार धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू रोहित शर्मा आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू ठरलाय. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली पाच हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे. रोहित आता तिसरा खेळाडू ठरला आहे.

हिटमॅनची आयपीएल कारकिर्द

रोहित शर्माने आयपीएलमध्ये आजच्या सामन्यापूर्वी 191 सामने खेळले आहेत. या 191 सामन्यात रोहित शर्माने 131 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 998 धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, रोहित शर्माने आयपीएलमधील षटकारांचं द्विशतक पूर्ण केलं आहे. तर रोहितने बॉलिंगनेही कमाल केली आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 15 विकेट घेतले आहेत. यात एका हॅट्रिकचा समावेश आहे.

महेंद्रसिंह धोनीसह अन्य तिघांना संधी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज शिखर धवन, सनराजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या खेळाडूंना 5 हजार धावा पूर्ण करु शकतात.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs MI, Live Score : मुंबईची खराब सुरुवात, क्विटंन डी कॉक भोपळा न फोडता माघारी

IPL 2020, KXIP vs MI : ऑरेंज कॅपसाठी मयंक अगरवाल-लोकेश राहुलमध्ये कडवी झुंज

(Rohit Sharma complete 5000 IPL runs )

Published On - 8:25 pm, Thu, 1 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI