पेहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात पैसा कमावण्यासाठी पोहोचला हा क्रिकेटर, IPL 2025 मध्ये सुद्धा केली कमाई
आयपीएलचा एक दिग्गज खेळाडू पेहेलगाम हल्ल्याच्या दोन दिवसानंतर पाकिस्तानात दाखल झाला आहे. IPL 2025 मध्येही त्याने पैसा कमावला. आता PSL मध्ये पैसा कमावण्यासाठी पाकिस्तानात गेलाय.

जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये 28 निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सगळ्या देशामध्ये संतापाच वातावरण आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आहेत. या दरम्यान न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर केन विलियमसन पाकिस्तानात पोहोचला आहे. 24 एप्रिलला त्याने लाहोरमध्ये पाऊल ठेवलं. विलियमसन PSL 2025 मध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला आहे. चालू सीजनसाठी त्याने कराची किंग्ससोबत कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. याआधी IPL 2025 मध्ये तो कॉमेंट्री करताना दिसला होता. भारतात आयपीएलमधून पैसा कमावल्यानंतर आता तो पाकिस्तानात कमाई करताना दिसेल.
केन विलियमसन पीएसएलमध्ये डेब्यू करणार आहे. 25 एप्रिल रोजी क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध तो पाकिस्तानी लीगमध्ये आपला पहिला सामना खेळेल. कराची किंग्सने त्याला सप्लीमेंट्री प्लेयर म्हणून ड्राफ्ट केलं होतं. रिपोर्टनुसार, त्याला 50 हजार डॉलर म्हणजे 42.70 लाख रुपये मिळतील. या सीजनमध्ये कराचीसाठी तो पहिले पाच सामने खेळू शकला नव्हता. या दरम्यान विलियमसन आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत होता.
आयपीएलमध्ये कॉमेंट्री करण्याचा निर्णय
या वर्षाच्या सुरुवातीला कराची टीमने केन विलियमसनला करारबद्ध केलं होतं. पण त्याने आयपीएलमध्ये कॉमेंट्री करण्याचा निर्णय घेतला. म्हणून पीएसएलमध्ये तो निम्मा सीजन दिसला नाही. भारतात कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केल्यानंतर आता तो या पाकिस्तानी लीगमध्ये खेळताना दिसेल. 34 वर्षाचा विलियमसन सनरायजर्स हैदराबाद टीममधील जुना सहकारी डेविड वॉर्नरसोबत एकत्र खेळेल. वॉर्नर या सीजनमध्ये कराची टीमच नेतृत्व करतोय.
मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड
केन विलियमसनचा आयपीएल करियर मोठं आहे. 2015 ते 2024 पर्यंत 10 सीजन तो खेळला. 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला कोणी विकत घेतलं नाही. त्यानंतर त्याने कॉमेंट्री करण्याचा निर्णय घेतला. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) तो प्रमुख खेळाडू होता.
