भुवी-बुमराहच्या गोलंदाजीवर गप्टिल चाचपडला, 1 वर आऊट होताच पॅव्हेलियनमध्ये जाऊन बॅट आपटली!

आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्यांदा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं.

भुवी-बुमराहच्या गोलंदाजीवर गप्टिल चाचपडला, 1 वर आऊट होताच पॅव्हेलियनमध्ये जाऊन बॅट आपटली!
Follow us
| Updated on: Jul 09, 2019 | 3:39 PM

IndvsNZ World Cup semi final लंडन : आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्यांदा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादवच्या जागी यजुवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराने झोकात सुरुवात केली. दोघांनी आपल्या पहिल्या ओव्हर मेडन टाकल्या. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टील आणि हेन्सी निकोल्स यांना भुवी-बुमराने फेकलेले बॉल खेळताच येत नव्हते. न्यूझीलंडने तिसऱ्या षटकातील पाचव्या बॉलवर खातं उघडलं.

यानंतर बुमराच्या दुसऱ्या आणि भारताच्या चौथ्या ओव्हरमध्ये दबावात असलेला मार्टिन गप्टिल विराट कोहलीकडे झेल सोपवून मोकळा झाला. तब्बल 14 चेंडूत 1 धाव करुन मार्टिन गप्टिल माघारी परतला. गप्टिल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 3.3 षटकात 1 बाद 1 अशी होती.

गप्टिल बाद झाल्यानंतर तो तावातावाने पॅव्हेलियनमध्ये गेला आणि त्याने आपली बॅट आपटली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांच्या दबावातून हा सामना किती हायव्होल्टेज आहे, हे दिसून येतं.

भारतानं सात सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकवलं आहे. मात्र आता उपांत्य फेरीत भारताचा बलाढ्य न्यूझीलंडशी मुकाबला होत आहे. साखळी सामन्यात पावसामुळे न्यूझीलंडसोबतचा सामना झाला नव्हता.  त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाज एकमेकांशी भीडत आहेत. आज किवींना हरवून कोहली ब्रिगेडला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक देण्याचा इरादा आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.