AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

French Open 2021: नोवाक जोकोविच पुन्हा चॅम्पियन, 19 वा ग्रँड स्लॅम नावावर, 52 वर्षानंतर असा कारनामा

नोवाक जोकोविचला खरंच तोड नाही. त्यानं क्ले कोर्टचा बादशाह राफेल नादालला सेमी फायनलमध्ये पाणी पाजलं आणि रविवारी फ्रेंच ओपन जिंकली.

French Open 2021: नोवाक जोकोविच पुन्हा चॅम्पियन, 19 वा ग्रँड स्लॅम नावावर, 52 वर्षानंतर असा कारनामा
Updated on: Jun 14, 2021 | 3:20 AM
Share

पॅरिस : नोवाक जोकोविचला खरंच तोड नाही. त्यानं क्ले कोर्टचा बादशाह राफेल नादालला सेमी फायनलमध्ये पाणी पाजलं आणि रविवारी फ्रेंच ओपन जिंकली. जोकोविचनं पुरुष एकेरीत ग्रीसचा युवा खेळाडू स्टेफानोस सितसिपासचा पराभव केला. फायनलचा सामना जोकोविचनं 6-7(6-8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा जिंकला. नदालचा पराभव करत जोकोविचनं फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता, तर सितसिपासनं जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवरचा पराभव करत पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅमचं फायनल गाठलं होतं. जोकोविचचा हा दुसरा फ्रेंच ओपन विजय आहे तर करिअरचा 19 वा (Novak Djokovic win French open 2021 tennis grand slam against Stefanos Tsitsipas).

जोकोविचच्या नावावर आज आणखी एक इतिहास लिहिला गेला. तो 52 वर्षातला असा एकमेव खेळाडू आहे ज्यानं पुरुष एकेरीचं प्रत्येक ग्रँड स्लॅम दोनदा जिंकलेलं आहे. एवढच नाही तर रॉय एमरसन आणि रॉड लावेर या दोघांसह जोकोविच असा तिसरा टेनिसपटू आहे, ज्यानं चारही ग्रँड स्लॅम दोन दोन वेळेस जिंकले. विशेष म्हणजे 20 ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नदाल आणि फेडररलाही अशी कामगिरी करता आलेली नाही. 1969 मध्ये लावेरने चारही ग्रँड स्लॅम एकापेक्षा जास्त वेळेस जिंकण्याचा कारनामा केला होता.

दोन सेटच्या पराभवानंतर पुनरागमन

सितसिपासनं सुरुवातीचे दोन्ही सेट जिंकले होते. जोकोविचनं पहिल्या सेटमध्ये ग्रीसच्या युवा खेळाडूला चांगली टक्कर दिली. पण 6-7(6-8) असा तो सेट गमावला. पहिल्या सेटच्या विजयानं सितसिपासचा आत्मविश्वास वाढला आणि दुसरा सेटही त्याने 6-2 ने जिंकला. पण समोर जोकोविच होता. एवढ्या सहज हार मानली असती तर तो महान कसा? तिसऱ्या सेटची सुरुवात 1-1 अशी होती. नंतर जोकोविचनं तो सेट 4-1 असा केला आणि शेवटी 6-3 असा जिंकला. सामना चौथ्या सेटमध्ये पोहोचला.

सितसिपासच्या पाठीत त्रास

तिसऱ्या सेटनंतर सितसिपाला पाठीत त्रास व्हायला लागला. त्यामुळे काही काळ खेळ थांबवला गेला. खेळ सुरु झाल्यानंतर चौथ्या सेटमध्येही चित्रं बदललं नाही. खेळावर जोकोविचनं पूर्ण कमांड मिळवली. पहिला गेम स्वत:च्या नावावर केल्यानंतर 3-0 अशी बढत घेतली. सितसिपासनेही ह्या सेटमध्ये दोन गेम स्वत:च्या नावावर केले पण तो जोकोविचला 6-2 असं जिंकण्यापासून रोखू शकला नाही.

पाचव्या सेटमध्ये सामना सुरुवातीला 1-1 ने बरोबरीत होता. पुन्हा जोकोविच 4-2 ने पुढे गेले. सितसिपासनं मात्र इथं खेळात पुन्हा पुनरागमन केलं स्कोअर 4-3 असा केला. पण जोकोविचनं त्याला सेट जिंकू दिला नाही. 6-4 असा पाचवा सेट जिंकत जोकोविचनं इतिहास घडवला.

असं पहिल्यांदाच नाही घडलं

पहिले दोन सेट गमावल्यानंतर ग्रँड स्लॅम स्वत:च्या नावावर करण्याची किमया जोकोविचनं काही पहिल्यांदा केलेली नाही. ही त्याची सहावी वेळ. 2005 चं विम्बल्डन, 2011 चं यूएस ओपन, 2012 ची फ्रेंच ओपन, 2015 सालची विंबलडन, तसच यावर्षीच्या फ्रेंड ओपनमध्येही जोकोविचनं पहिले दोन सेट गमावल्यानंतर सामन्यात वापसी केलेली होती.

तीन दिवस कठिण गेले

फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर जोकोविच म्हणाला की, तीन दिवस त्याच्यासाठी कठिण गेले. तो म्हणतो, हा शानदार माहौल आहे. मी माझे कोच, फिजियो यांचे आभार व्यक्त करु इच्छितो. तसच त्याचेही ज्यांनी मला ह्या प्रवासात साथ दिली. गेल्या 48 तासात मी 9 तास खेळलो आहे तेही दोन महान खेळाडूंच्याविरोधात. गेले तीन दिवस शारिरीकदृष्ट्या कठिण होते. पण मी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला माहित होतं की हे मी करु शकतो.

हेही वाचा :

ENG vs NZ: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड, न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभवामुळे ओढावली नामुष्की

WTC Final पूर्वी न्यूझीलंडचं शक्तिप्रदर्शन, इंग्लंडवर 8 विकेट्सने मात करत मालिकाविजय

10 सामन्यांत घेतले 67 विकेट्स तरीही भारतीय संघात जागा नाही, ‘या’ गोलंदाजाने मांडली व्यथा

व्हिडीओ पाहा :

Novak Djokovic win French open 2021 tennis grand slam against Stefanos Tsitsipas

खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले ७३ तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले ७३ तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.