French Open 2021 : चेक रिपब्लिकची बाबरेरा क्रेजिकोव्हा विजयी, आयुष्यातील पहिल्या ग्रँडस्लॅमवर कोरलं नाव

Womens Singles Final Of French Open 2021 Won by Barbora Krejcikova by beating Anastasia Pavlyuchenkova

French Open 2021 : चेक रिपब्लिकची बाबरेरा क्रेजिकोव्हा विजयी, आयुष्यातील पहिल्या ग्रँडस्लॅमवर कोरलं नाव
बाबरेरा क्रेजिकोव्हा

पॅरिस : जागतिक टेनिसमधील मानाची स्पर्धा असणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये चेक रिपब्लिकच्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात रशियाच्या अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाला नमवत बाबरेराने विजय आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे तिचे हे कारकीर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.(Womens Singles Final Of French Open 2021 Won by Barbora Krejcikova by beating Anastasia Pavlyuchenkova)

फ्रान्सच्या पॅरिस शहरात ही स्पर्धा पार पडली. फिलिपे चॅट्रियर मैदानावर चाललेल्या या सामन्यात बाबरेराने अनास्तासियावर 6-1, 2-6, 6-4 च्या फरकाने विजय मिळवला. जवळपास दोन तास सुरु असलेला हा सामना सुरुवातीपासूनच चूरशीचा सुरु होता. याआधी एकदाही ग्रँडस्लॅम न पटकावलेल्या बाबरेरासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे हा जिंकण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न तिने केले, ज्यात अखेर तिला यश मिळाले.

कसा झाला सामना

सुरुवातीपासूनच चूरशीत सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये बाबरेराने अप्रतिम प्रदर्शन करत 6-1 च्या मोठ्या फरकाने सेट आपल्या नावे केला ज्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये रशियाच्या अनास्तासियाने पुनरागमन करत 6-2 च्या फरकाने विजय मिळवला. ज्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये बाबरेराने कोणतीही चूक न करता 6-4 च्या फरकाने विजय मिळवत सामनाही आपल्या नावावर केला. या विजयासह बाबरेराने फ्रेंच ओपनच्या ट्रॉफीसह आयुष्यातील पहिले ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले.

बाबरेराला अश्रू अनावर

युवा टेनिसपटू बाबरेरा अवघ्या 25 वर्षांची असून इतक्या मोठ्या विजयामुळे ती कमालीची भारावून गेली. ज्यामुळे विजयानंतर तिला अश्रू अनावर झाले. तिने तिच्या सर्व जवळच्या व्यक्तींसह चाहत्याचे आभार मानले आणि प्रशिक्षक, चाहते यांच्यामुळेच मी हा विजय मिळवू शकले असंही बाबरेराने सांगितले.

हे ही वाचा :

French Open 2021 : नोवाक जोकोविचचा अप्रतिम विजय, राफेल नदालला पराभूत करत गाठली अंतिम फेरी

Euro 2020: सलामीच्या सामन्यात इटलीचा टर्कीवर दणदणीत विजय, युरो चषक स्पर्धेची दमदार सुरुवात

Video : Live सामन्यात शाकिब अल हसनला राग अनावर, अंपायरवर भडकून थेट स्टंपलाच मारली लाथ

(Womens Singles Final Of French Open 2021 Won by Barbora Krejcikova by beating Anastasia Pavlyuchenkova)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI