Ishan Kishan Education : बिहारच्या या शहरातून घेतले शिक्षण, नोटबुकमध्ये होमवर्कच्याऐवजी ईशान किशन रंगवत होता हे स्वप्न..

Ishan Kishan Education : ईशान किशनने लहानपणापासूनच क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले होते..

Ishan Kishan Education : बिहारच्या या शहरातून घेतले शिक्षण, नोटबुकमध्ये होमवर्कच्याऐवजी ईशान किशन रंगवत होता हे स्वप्न..
शिक्षणापेक्षा क्रिकेटमध्ये प्रगतीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 7:03 PM

नवी दिल्ली : बांगलादेशाच्या (Bangladesh) विरोधातील एकदिवसीय (One Day) सामन्यात आपल्या दमदार खेळीने ईशान किशनने (Ishan Kishan) मैदान गाजवले. त्याने द्विशतकी खेळी खेळली. त्याचे लहानपणापासूनच क्रिकेटर होण्याचे स्वप्न होते. अभ्यासापेक्षा त्याचे क्रिकेटमध्येच जास्त लक्ष लागत होते. बालवयातच ईशानने बॅट हाती धरत मैदान गाजवायला सुरुवात केली होती. त्याचा भाऊ राज किशनने त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मदत केली. क्रिकेटव्यतिरिक्त ईशान टेबल टेनिस (Table Tennis) आणि बिलियर्डसमध्ये चांगली कामगिरी बजावतो. खेळामध्ये नशीब कमाविणाऱ्या ईशानचे शिक्षण किती झाले, असा प्रश्न सर्वांनाच पडतो..

ईशानचे पूर्ण नाव ईशान प्रणव कुमार पांडे किशन असे आहे. त्याचे टोपणनाव तर भन्नाटच आहे, त्याला लाडाने डेफिनेट असे म्हणतात. 5 फुट 6 इंच उंची असलेल्या ईशानला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. त्याचा जन्म 18 जुलै 1998 रोजी पटण्यातील नवादा येथे झाला. त्याचे संपूर्ण शिक्षण बिहारमध्येच झाले आहे.

ईशानच्या वडिलांचे नाव प्रणव कुमार पांडे आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याच्या आईचे नाव सुचित्रा असून त्या गृहिणी आहेत. ईशानच्या मोठ्या भावाचे नाव राज किशन आहे. तो ही क्रिकेट खेळाडू आहे. राज किशनने राज्यस्तरावर क्रिकेट खेळला आहे.

हे सुद्धा वाचा

ईशानचे शिक्षण पटणा येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशानने अगदी कमी वयापासून बॅट हातात धरली. क्रिकेटमध्ये त्याचे अधिक लक्ष होते. त्याचे अभ्यासाकडे कायम दुर्लक्ष होते. त्याला कित्येकदा वर्गाबाहेर उभं करण्यात आले आहे.

होमवर्कच्या वहीत तो अनेकदा क्रिकेटचे मैदान काढत होता आणि रंगवत होता. शिक्षकांची तक्रार होती की, त्याने शिक्षणात कधीच लक्ष घातले नाही. तो अभ्यासाकडेही दुर्लक्ष करत होता. शालेय शिक्षणानंतर ईशानने पाटणा येथील कॉलेज ऑफ कॉमर्स मधून शिक्षण पूर्ण केले.

सातव्या वर्षापासूनच तो शाळेच्या क्रिकेट टीमचे नेतृत्व करत होता. स्कूल वर्ल्ड कपमध्ये त्याने शाळेचे प्रतिनिधित्व केले. या विश्वकपाचे सामने अलिगढ येथे झाले होते. काही कारणामुळे ईशान बिहारऐवजी झारखंड क्रिकेट टीमचे प्रतिनिधित्व करत होता.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.