AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games मध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या फुटबॉलपटू सुभाष भौमिक यांचे निधन

भारताचे माजी फुटबॉलपटू सुभाष भौमिक (Subhash Bhowmick) यांचे शनिवारी कोलकाता येथे निधन झाले. 71 वर्षीय सुभाष 1970 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या संघाचा भाग होते.

Asian Games मध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या फुटबॉलपटू सुभाष भौमिक यांचे निधन
Subhas Bhowmick
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 1:16 PM
Share

मुंबई : भारताचे माजी फुटबॉलपटू सुभाष भौमिक (Subhash Bhowmick) यांचे शनिवारी कोलकाता येथे निधन झाले. 71 वर्षीय सुभाष 1970 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) कांस्यपदक विजेत्या संघाचा भाग होते. एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खूप यश मिळवले. एआयएफएफने (AIFF) शनिवारी अधिकृतपणे भौमिक यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आणि सुभाष यांना श्रद्धांजलीही वाहिली.

भौमिक यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1950 रोजी झाला. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. 30 जुलै 1970 रोजी मर्डेका कपमध्ये फॉर्मोसाविरुद्ध पहिला सामना खेळले. त्यांनी भारतासाठी 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात त्यांनी 9 गोल केले. 1971 च्या मर्डेका चषकात त्यांनी फिलिपाइन्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. या सामन्यात भारताने 5-1 असा विजय मिळवला होता. भौमिक यांच्या जाण्याने चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून, त्यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले.

देशांतर्गत स्तरावर मोठे यश

1968 मध्ये त्यांनी राजस्थान क्लबमधून व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी कोलकाता फुटबॉल लीगमधील पहिल्या सत्रात सात गोल केले. देशांतर्गत स्तरावर, भौमिक यांनी बंगालसाठी पाच वेळा संतोष ट्रॉफीमध्ये भाग घेतला. यापैकी चार वेळा आपल्या नेतृत्वाखाली त्याने संघाला चॅम्पियन बनवले आणि 24 गोल केले. ईस्ट बंगालकडून खेळताना त्यांनी 82 गोल केले आणि आपल्या संघाला तीन वेळा कलकत्ता फुटबॉल लीगचे विजेतेपद मिळवून दिले, तर त्यांनी तीन वेळा आपल्या क्लबसाठी आयएफए शिल्डचे विजेतेपदही पटकावले.

प्रशिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द

भौमिक यांनी प्रशिक्षक म्हणूनही यश संपादन केले. 2003 मध्ये, ते प्रशिक्षक असताना, ईस्ट बंगालने जकार्ता येथे आयोजित एलजी आशियाई क्लब कपचे विजेतेपद पटकावले. ते प्रशिक्षक असताना 2002-2004 दरम्यान काठमांडू येथे झालेल्या राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये ईस्ट बंगालने विजेतेपद पटकावले. क्लबने 2002 मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखाली IFA शील्ड कप जिंकला. त्याच वर्षी संघाने डुंरड चषकही जिंकला. त्यांनी तांत्रिक संचालक म्हणूनही काम केले. 2012-2013 मध्ये आय-लीगचे जेतेपद क्लब चर्चिल ब्रदर्सने पटकावले तेव्हा भौमिक त्या संघाचा भाग होते. त्यांनी मोहन बागानला 1992 साली सिक्कीम गोल्ड कप जिंकण्यास मदत केली होती. 2017 मध्ये त्यांना ईस्ट बंगाल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इतर बातम्या

IND vs SA, 2nd ODI: भारताने कसोटी पाठोपाठ वनडे मालिकाही गमावली

IPL 2022 आयोजनासंबंधी BCCI ची शनिवारी मोठी बैठक, होणार महत्त्वाचे निर्णय

IND vs SA, Virat Kohli: शुन्यावर आऊट झाल्यानंतरही विराट कोहलीचा ड्रेसिंग रुममध्ये डान्स पाहा VIDEO

(Asian Games medallist stalwart footballer Subhas Bhowmick Dies At 72)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.