AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेत भारताची विजयी सलामी, हरमनप्रीत सिंहची हॅटट्रीक

आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारताने विजयी सलामी दिली आहे. ही स्पर्धा हॉकी वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रतेसाठी खूपच महत्त्वाची आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्यामुळे भारतासाठी प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेत भारताची विजयी सलामी, हरमनप्रीत सिंहची हॅटट्रीक
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेत भारताची विजयी सलामी, हरमनप्रीत सिंहची हॅटट्रीकImage Credit source: Hockey India Twitter
| Updated on: Aug 29, 2025 | 5:57 PM
Share

आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत आणि चीन हे संघ आमनेसामने आले होते. बिहारच्या राजगीरध्ये हा सामना खेळला गेला. पहिल्याच सामन्यात भारताने चीनला 4-3 ने मात दिली. या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंहने तीन गोल मारले. चीनने पहिला गोल 12 मिनिटाला मारला आणि भारतावर दबाव आणला होता. मात्र त्यानंतर जुगराज सिंहने 18 व्या मिनिटाला गोल केला आणि बरोबरी साधली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 व्या आणि 33 व्या मिनिटाला गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. चीनकडून चेन बेनहाईने 35 व्या मिनिटाला गोल मारला आणि 3-2 अशी स्थिती आणली. त्यानंतर गाओ जिशेंगने 41 व्या मिनिटला गोल मारला आणि 3-3 अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय अशीस स्थिती होती. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने 47 व्या मिनिटाला गोल मारला आणि सामना आपल्या पारड्यात झुकवला. भारताने हा सामना 4-3 ने जिंकला.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात गोलची हॅटट्रीक मारली. त्याच्या तीन गोलमुळेच भारताला विजय मिळवणं शक्य झालं. पहिला गोल त्याने 20 व्या मिनिटाला केला. दुसरा गोल तिसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटाला केला. पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं. तसेच शेवटच्या सत्राच्या दुसऱ्या मिनिटाला निर्णायक गोल मारला. हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नर मारत संघाला 4-3 ने विजय मिळवून दिला. आता भारताचा पुढचा जापानशी होणार आहे. हा सामना 31 ऑगस्टला होणार आहे. भारताच्या गटात चीन, कझाकिस्तान आणि जापान हे संघ आहेत. त्यापैकी चीनला साखळी फेरीत मात दिली आहे.

आशिया कप स्पर्धेचं हे 12वं पर्व असून भारताने तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2003, 2007 आणि 2017 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. तसं पाहिलं तर दक्षिण कोरियाचा या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. त्यांनी पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. 1994, 1999, 2013 आणि 2022 मध्ये विजय मिळवला आहे. आता या स्पर्धेत भारत प्रमुख दावेदार आहे. भारताने जेतेपद मिळवलं तर बेल्जियम-नेदरलँडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरेल.

आशिया हॉकी कपसाठी भारतीय संघ

  • गोलकीपर: सूरज करकेरा, कृष्ण बहादुर पाठक.
  • डिफेंडर: हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंह, सुमित, संजय, जुगराज सिंह.
  • मिडफील्डर: मनप्रीत सिंह, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंह, राज कुमार पाल, हार्दिक सिंह.
  • फॉरवर्ड: मनदीप सिंह, अभिषेक, सुखजीत सिंह, दिलप्रीत सिंह, शिलानंद लाकड़ा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.