AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बास्केटबॉल खेळाडूच्या दुर्दैवी मृत्यूनंतर क्रीडा अधिकारी सस्पेंड, विनेश फोगाट सरळ म्हणाली…

हरियाणात बास्केटबॉलपटू खेळाडूचा दुर्दैवी मृ्त्यूनंतर संतापाची लाट उसळली आहे. हरियाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दुसरीकडे, कुस्तीपटू विनेश फोगाटने सरकारवर निशाणा साधला आहे.

बास्केटबॉल खेळाडूच्या दुर्दैवी मृत्यूनंतर क्रीडा अधिकारी सस्पेंड, विनेश फोगाट सरळ म्हणाली...
बास्केटबॉल खेळाडूच्या दुर्दैवी मृत्यूनंतर क्रीडा अधिकारी सस्पेंड, विनेश फोगाट सरळ म्हणाली...Image Credit source: Phogat_Vinesh Twitter/ Video Grab
| Updated on: Nov 26, 2025 | 5:43 PM
Share

हरियाणात बास्केटबॉल सरावादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. एक घटना बहादूरगड आणि दुसरी घटना रोहतकमध्ये घडली. या घटनेमुळे राज्यातील क्रीडा मैदानं आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मृत्यूच्या घटनेनंतर क्रीडाविश्वात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सरकारही खडबडून जागं झालं आहे. या घटनेची दखल हरियाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांनी घेतली आहे. या प्रकरणात जिल्हा खेळ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घटना घडलेल्या ठिकाणीतील संपूर्ण नर्सरी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच काय तर या घटनांची उत्तस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे.

या घटनेनंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्या विनेश फोगट यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विनेश फोगाट यांनी सांगितलं की, “सत्य हे आहे की हरियाणातील मुले मैदानात आपले प्राण गमावत आहेत आणि भाजप सरकार कागदावर आणि जाहिरातींमध्ये ‘विकास’ शोधत आहे. हे व्यवस्थेचे अपयश नाही, तर व्यवस्थेची हत्या आहे. आणि त्यासोबतच, मुलांची स्वप्ने, त्यांचा विश्वास आणि त्यांचे भविष्य मारले जात आहे. हे क्रीडा धोरण नाही, तर खेळाडूंच्या स्वप्नांची ही उघड हत्या आहे.”

बहादुरगडच्या रेल्वे रोडवरील शहीद ब्रिगेडियर होशियार सिंह मैदानात रविवारी 15 वर्षीय बास्केटबॉलपटू अमन सराव करत होता. तेव्हा जीर्ण झालेला एक पोल अचानक तुटला आणि त्याच्या अंगावर पडला. पोल थेट अमनच्या पोटावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण प्रकृती खालावली आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. दहावीत शिकणाऱ्या नुकतेच शाळेच्या क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले होते.

रोहतकमधील कलानौर येथेही अशीच दुर्दैवी घटना घडली. बास्केटबॉल कोर्टवर सराव करत असलेल्या 17 वर्षीय हार्दिक राठीचा खांब तुटून त्याच्यावर पडल्याने मृत्यू झाला. हार्दिक हा एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू होता, त्याने दोनदा राष्ट्रीय सब-ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये खेळले होते.

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.