रिंगमध्ये परतण्यासाठी बॉक्सर विजेंदर सिंग सज्ज, गोव्यात जहाजाच्या डेकवर रंगणार सामना

विजेंदरचा (Boxer Vijender Singh) हा एकूण 13 वा तर भारतातील 5 वा सामना असणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:10 AM, 3 Mar 2021
रिंगमध्ये परतण्यासाठी बॉक्सर विजेंदर सिंग सज्ज, गोव्यात जहाजाच्या डेकवर रंगणार सामना
विजेंदरचा (Boxer Vijender Singh) हा एकूण 13 वा तर भारतातील 5 वा सामना असणार आहे.

गोवा : भारताला 2008 मध्ये ऑल्मपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग   (Vijender Singh)  रिंगमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. विजेंदरने काही दिवसांपूर्वीच आपण कमबॅक करत असल्याची माहिती दिली होती. त्याचा हा सामना त्याच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. विजेंदर 19 मार्चला गोव्या एका कॅसीनो जहाजाच्या डेकवर सामना खेळणार आहे. यामुळे हा सामना त्याच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान विजेंदर या रिंगमध्ये कोणासोबत दोन हात करणार आहे, हे अजून ठरलेलं नाहीये. (Vijender Singh play his next match 19 march on Rooftop Deck casino ship Goa)

व्यावसायिक बॉक्सर असलेल्या विजेंदरचा हा एकूण 13 वा तर भारतातील 5 वा सामना असणार आहे. विजेंदरने नोव्हेंबर 2019 मध्ये पूर्व राष्ट्रमंडळ चॅम्पियन राहिलेल्या चार्ल्स अदामुचा दुबईत पराभव करुन सलग 12 वा विजय साजरा केला होता. त्यानंतर विजेंदर बॉक्सिंगपासून दूर होता.

गोव्यात सामन्याचं आयोजन

या सामन्याचं आयोजन हे जहाजाच्या डेकवर करण्यात आले आहे. गोव्यातील पणजीमधील मांडवी नदीच्या किनाऱ्यावर हे जहाज आहे. हा सामना नेहमीच्या सामन्यांपेक्षा हटके असणार आहे. त्यामुळे विजेंदरच्या चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

गोव्यात खेळण्यासाठी उत्सुक

“मी गोव्यात खेळण्यासाठी फार उत्सुक आहे. गोव्यातील जनता ही क्रीडाप्रेमी आहे. गोव्यात फुटबॉलची पण फार क्रेझ आहे. त्यासोबतच अनेकांना बॉक्सिंगचेही वेड आहे. गोव्यात खेळाडूं सन्मानजनक वागणूक दिली जाते”, असंही विजेंदरने स्पष्ट केलं.

विजेंदर काय म्हणाला?

“हा सामना जहाजाच्या डेकवर होत असल्याने मी खेळण्यासाठी फार उत्सुक आहे, अशी उत्सफूर्त प्रतिक्रिया विजेंदरने दिली. याआधी अशा प्रकारे कधी सामना झाला नव्हता. त्यामुळे मी रिंगमध्ये परतण्यासाठी सज्ज आहे. मी या सामन्यासाठी जोरदार सराव करतोय”, असं विजेंदर म्हणाला. त्यामुळे विजेंदरकडून त्याच्या समर्थकांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

संबंधित बातम्या :

जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह

ICC Player of the Month Award | आयसीसीकडून 3 खेळाडूंना नामांकन, इंग्लंड विरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनही स्पर्धेत

(Vijender Singh play his next match 19 march on Rooftop Deck casino ship Goa)