AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड दौऱ्यावर तरुणीवर बलात्कार, पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूला मैदानातूनच उचलले, पोलिसांनी अटक करताच…

Pakistan Cricketer Haider Ali arrested in UK : पाकिस्तानचा तरुण क्रिकेटपटू हैदर अली याला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केली आहे. एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर तरुणीवर बलात्कार, पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूला मैदानातूनच उचलले, पोलिसांनी अटक करताच…
पाकिस्तानी क्रिकेटपटूला अटकImage Credit source: Getty Images
| Updated on: Aug 08, 2025 | 9:38 AM
Share

पाकिस्तान क्रिकेट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, पण यावेळी एक अतिशय लज्जास्पद घटना घडली आहे. तरुण खेळाडू हैदर अलीला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केली. तो पाकिस्तानच्या ‘ए’ टीम पाकिस्तान शाहीनसोबत युनायटेड किंग्डमच्या दौऱ्यावर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर ही अटक करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हैदर अलीला सध्या निलंबित केलं आहे.

एका रिपोर्टनुसार, हैदरला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी बेकेनहॅम ग्राउंडवरून अटक केली. पाकिस्तान शाहीन ही टीम 3 ऑगस्ट रोजी MCSAC विरुद्ध खेळत होती. टेलिकॉम एशिया स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, “हा पाकिस्तानी वंशाच्या मुलीविरुद्ध बलात्काराचा खटला आहे,” असे एका सूत्राने सांगितले.

अटक करताच कोसळलं रडू

ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी हैदरचा पासपोर्ट जप्त केलाय, पण त्याला जामिनावर सोडले आहे याची सूत्रांनी पुष्टी केली. ते तपासात सहकार्य करतील आणि हैदरला खटला लढण्यास पाठिंबा देतील असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सांगितलं. दरम्यान, या प्रकरणात कोणताही निर्णय होईपर्यंत पीसीबीने हैदर अलीला निलंबित केले आहे. “आम्हाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे आणि चौकशी सुरू आहे. आम्ही हैदरला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे आणि आम्ही यूकेमध्ये आमची स्वतःची चौकशी करू,” असे पीसीबीच्या प्रवक्त्याने www.telecomasia.net ला सांगितलं. “हैदरला मैदानावरून अटक केल्यानंतर तो रडू लागला. चौकशीदरम्यान त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगितले.” अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तान शाहीन संघ 17 जुलै ते 6ऑगस्ट या कालावधीत युके दौऱ्यावर होता आणि त्यांनी दोन, तीन दिवसीय सामने खेळले, जे दोन्ही अनिर्णित राहिले. त्यांनी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. कर्णधार सौद शकील आणि हैदर वगळता बहुतेक खेळाडू बुधवारी युकेहून परतले.

24 वर्षीय हैदर हा एक प्रतिभावान खेळाडू आहे ज्याने पाकिस्तानसाठी दोन एकदिवसीय आणि 35 टी-20० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आशियाई स्पर्धेत शेवटचा खेळ त्याने दोन वर्षांपूर्वी खेळला होता. तो 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात पाकिस्तानकडून खेळला होता, तिथूनच भारताचा यशस्वी जयस्वालचाही उदय झाला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.