‘दहशतवादी देश सोडून द्यायला हवा’ ट्विट लाईक केले, पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आमिर अडचणीत

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर एक ट्विट लाईक केल्याने अडचणीत सापडला आहे. केवळ 27 वर्षांच्या वयात त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

‘दहशतवादी देश सोडून द्यायला हवा’ ट्विट लाईक केले, पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आमिर अडचणीत


इस्लामाबाद: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर एक ट्विट लाईक केल्याने अडचणीत सापडला आहे. केवळ 27 वर्षांच्या वयात त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तात्काळ आमिरने ब्रिटेनच्या व्हिजासाठी अर्ज केला. त्यामुळे आमिर पाकिस्तान सोडून ब्रिटनला स्थायिक होणार असल्याचीही चर्चा सुरु होती. त्यातच आमिरने एक वादग्रस्त ट्विट लाईक केल्याने त्याला ट्रोल केलं जात आहे.

पाकिस्तानचे क्रिडा पत्रकार साज सादिक यांनी ट्विट केले होते, “काही लोक का कुणास ठाऊन पण क्रिकेटर मोहम्मद आमिरच्या ब्रिटिश पासपोर्टसाठीच्या अर्जाविषयी जास्तच वाढवून बोलत आहे. त्याला ब्रिटिश पासपोर्टसाठी अर्ज करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की तो पाकिस्तानसाठी खेळणे बंद करेल.”

साज सादिक यांच्या या ट्विटवर अभिषेक बिंदल नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आले. यात लिहिले होते, “मला वाटतं मोहम्मद आमिरने दहशतवादी देश सोडून द्यायला हवा.” त्यानंतर या ट्विटला मो. आमिरने लाईक केल्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. संबंधित वादग्रस्त ट्विटला लाईक केल्यावर आमिरने तात्काळ ते डिसलाईकही केल्याचं सांगितलं जातं. मात्र, सध्या हे स्क्रिनशॉट व्हायरल होत असून आमिर ट्रोल होत आहे.

मोहम्मद आमिरने ब्रिटेनच्या व्हिजासाठी अर्ज केल्यानंतर तो ब्रिटनमध्येच स्थायिक होऊ इच्छितो अशी चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, आमिरची पत्नी नरगिस मलिका ब्रिटनची नागरिक आहे. तिने आधीच स्पाऊस व्हिजासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आमिरला इंग्लंडमध्ये 30 महिन्यांपर्यंत राहता येणार आहे. आमिर लंडनमध्ये घर खरेदीसाठीही प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. मात्र, आमिरला कायमस्वरुपी ब्रिटिश नागरिकत्व मिळण्यात काही अडथळेही आहेत. आमिरला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ब्रिटनच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI