AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BWF World Championships 2021: सिंधूला पराभवाचा धक्का, तै त्झूने चुकता केला हिशोब

याच स्पर्धेत २०१९ साली सिंधूने तै त्झूला पराभूत केले होते. कोर्टबाहेर सिंधू आणि त्झू परस्परांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

BWF World Championships 2021: सिंधूला पराभवाचा धक्का, तै त्झूने चुकता केला हिशोब
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 4:52 PM
Share

नवी दिल्ली: गतविजेत्या पी.व्ही.सिंधूला (PV Sindhu) शुक्रवारी BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. महिला एकेरीत तैवानच्या तै त्झू यिंगने (Tai Tzu ying) सरळ सेटमध्ये सिंधूचा पराभव केला. महिला एकेरीत पहिल्या स्थानावर असलेल्या तै त्झूने सिंधूचा 21-17, 21-13 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ४२ मिनिटात सामन्याचा निकाल लागला. तै त्झच्या वेगाशी जुळवून घेणं सिंधूला जमलं नाही. सिंधूने या सामन्यात अनेक चुका केल्या. त्यामुळे तै त्झूचा काम अधिक सोपं झालं.

ऑलिंपिकमध्ये दुहेरी पदक विजेती कामगिरी करणाऱ्या सिंधूचा यावर्षी टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत तै त्झू ने पराभव केला होता. सिंधू जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. तै त्झूने एकप्रकारे हिशोब चुकता केला. याच स्पर्धेत २०१९ साली सिंधूने तै त्झूला पराभूत केले होते. कोर्टबाहेर सिंधू आणि त्झू परस्परांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

काल सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगवर शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. कालच्या सामन्यात सिंधूने चोचुवँगला कुठेही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आपल्या खेळाने पूर्णपणे तिला निष्प्रभावी करुन टाकले होते. पण आज सिंधूला तसा खेळ करणं शक्य झालं नाही. तै त्झूने दर्जेदार खेळाचं प्रदर्शन करत शानदार विजयाची नोंद केली.

संबंधित बातम्या: IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.